औरंगाबाद, 16 जून : शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये (Aurangabad ST stand) दिवसाला हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एसटी महामंडळ पैसे आकारते. मात्र, प्रवाशांना सुविधा पुरेशा दिल्या जात नाहीत. मध्यवर्ती बसस्थानकातर्फे प्रवाशांची तहान भागवण्यासाठी पाण्याची टाकी बसवण्यात आले आहे. मात्र, या पाण्याच्या टाकीशेजारी दुर्गंधी आणि आळ्या आढळून आल्या आहेत. त्यासोबतच दारूच्या बाटल्यादेखील पिण्याच्या पाण्याजवळ सापडल्या आहेत. (Issue of Drinking Water in Aurangabad ST stand) देशभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने देशातील सर्व जनजीवन विस्कळीत झालं होतं. यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. आणि याचाच परिणाम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी लालपरी म्हणून ओळखल्या जाणारी एसटी महामंडळाची बसहीदेखील बंद झाली होती. हळुहळु कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आणि एसटी रस्त्यावर धावू लागली. यात एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू केला आणि हा संप अनेक दिवस सुरू राहिला. यामुळे लालपरी संकटात सापडली होती. गेल्या काही दिवसांपासून हा संप आता मिटला आहे, यामुळे लालपरी आता सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर धावू लागले आहे. वाचा : Aurangabad : ‘फ्रिज अन् पाण्याच्या जार’मुळे कुंभार व्यावसायिक कोलमडला, ऐका त्यांच्याच तोंडून ‘ही’ कर्म कहाणी! पैसे खर्च करून भागवावी लागते प्रवशांना तहान नुकताच उन्हाळा संपत आला आहे. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपासून शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. अशातच आणि एक नागरिक एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत होते. मात्र, मध्यवर्ती बस स्थानकामध्ये अस्वच्छ पाणी असल्यामुळे अनेक प्रवाशांना पाणी मिळाले नाही. तर अनेकांना पैसे खर्च करून आपली तहान भागवावी लागली. वाचा : Aurangabad : अरे बापरे! भांडकुदळ बायको नको, म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी केली पिंपळाची पूजा, VIDEO मोटार बंद असल्यामुळे स्वच्छता नाही एसटी महामंडळ प्रत्येक प्रवाशांकडून प्रवासाचे भाडे आकारले जाते. यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या दराने तिकीट घेतले जातात. तिकीटविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळातर्फे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, प्रवाशांकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवासी भाड्याच्या मोबदल्यात प्रवास यांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. बस्थानकाचे व्यवस्थापक संतोष घाणे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की, “पाण्याची मोटर बंद असल्याने पाण्याच्या टाकीजवळ स्वच्छता करण्यात आली नाही. मोटर दुरूस्त होताच, ही स्वच्छता करण्यात येईल.”