JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पावसानं पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीनचे भाव गगनाला भिडणार?

पावसानं पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीनचे भाव गगनाला भिडणार?

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे परिणाम सोयाबीनच्या भाव वाढीवर होण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद: शेतकऱ्यांसाठी तात्काळ पैसा देणाऱ्या नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे बघितले जाते यामुळे सर्वाधिक शेतकरी सोयाबीन कडे वळले आहेत मात्र यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनच्या पिकावर ती मोठे संकट आले आहे.पावसामुळे यामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे परिणाम सोयाबीनच्या भाव वाढीवर होण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. गेल्या वर्षी सोयाबीनच्या शेवटच्या हंगामात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला होता या भाववाढीचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी वर्गाला अधिक झाला होता दरम्यान गेल्यावर्षी सोयाबीनला मिळालेल्या उत्साहांची भावामुळे शेतकऱ्यांनी यावेळेस मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतलं मात्र अतिवृष्टी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दरम्यान आता शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातून काढायला सुरुवात केली आहे. औरंगाबाद विभागातील खरीप हंगामातील पिकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 212.5 टक्के तर जालना जिल्ह्यामध्ये 145. 36 टक्के तर बीड जिल्ह्यामध्ये 152.38 टक्के सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. एकूण औरंगाबाद विभागातील औरंगाबाद जालना बीड या तीन जिल्ह्यांची मिळून 152.90 टक्के एवढ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती औरंगाबाद कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (कोट)केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एमएसपी पेक्षा सध्या सोयाबीनच्या किमतीमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ बाजारामध्ये दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान आणि ठिकाणी झालेला आहे यामुळे सोयाबीनचा तुटवडा जाणवल्यास सोयाबीनच्या किमतींमध्ये सध्याच्या किमतीपेक्षा वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

औरंगाबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 25 एवढी आहे सध्या सोयाबीनचे किमान दर 4001 तर कमाल दर 4676 एवढे आहेत.- काचारू पठाडे,खरेदी विक्री संघ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या