औरंगाबाद, 25 जुलै : लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणींच्या आयुष्यातील असा महत्वाचा क्षण असतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलते. वयात आल्याबरोबर लग्न जमवण्यासाठी घरात हालचाली सुरु होतात. मुलगा असेल तर मुलगी पाहण्यासाठी अन् मुलगी असेल तर मुलगा पाहण्यासाठी नातेवाईकांना सांगितले जाते. बऱ्याच वेळा नात्यातच लग्न ठरवले जाते. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यात लग्न (marriage in relation) होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या मुलांमध्ये आजाराचे प्रमाण (marriage in relation problem) जास्त असते. या आजारातून दुभंगलेले ओठ व दुभंगलेली टाळू असे व्यंग असलेले अपत्य जन्माला येतात. यावर कसे उपचार घ्यावेत कुठे मिळेल मोफत उपचार आणि काय काळजी घ्यावी यासंबंधी असे व्यंग असलेल्या तब्बल चार हजार पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केल्याचा अनुभव असलेल्या तज्ञ प्लास्टिक सर्जन डॉ.उज्ज्वला दहिफळे यांनी माहिती दिली आहे. गर्भवती महिलांना घ्यायची काळजी दुभंगलेले ओठ व दुभंगलेली टाळू हे आजार टाळण्यासाठी गर्भवती मातांनी हिरव्या पालेभाज्या, संपुर्ण धान्यडाळी आणि मोसंबी इत्यादी पदार्थ जेवणामध्ये ठेवल्यास याची मदत होऊ शकते. त्यासोबतच गर्भवती मातेने डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून कमतरता असलेल्या गोष्टींची भरपाई केल्यास हे आजार टाळता येऊ शकतात, असे डॉ. दहिफळे यांनी सांगितले. कधी होतील उपचार? दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकावर उपचार करण्यासाठी कमीतकमी 4 ते 6 महिने वय असणे गरजेचे आहे. तसेच वजन 5 ते 6 किलो, हिमोग्लोबिनचे प्रमाण10 ग्रॅम असावे लागते. तर दुभंगलेल्या टlळु असलेल्या बालकांचे वय 9 महिने ते 18 महिन्यापर्यंत असावे तर वजन 10 किलो हिमोग्लोबिन 10 ग्रॅम असावे.
गुगल मॅपवरून साभार असा मिळेल मोफत उपचार तुमच्या बाळाला या प्रकारचं व्यंग असेल तर तुम्ही डॉक्टर दहिफळे रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता.यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. स्वतः बाळाला घेऊन जाणे.नंतर जेव्हा हॉस्पिटलला बोलवले जाईल तेंव्हा त्याला घेऊन जावे लागते. काय कागदत्रं हवी? या प्रकारच्या आजारावरील उपचारासाठी बाळाच्या जन्माचा दाखला/आधार कार्ड, आई/ वडिलांचे आधार कार्ड रेशन कार्ड, तहसील कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला लागतो.सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत रुग्णालयात उपचार केले जातात. या उपचारासाठी वयाची मर्यादा नाही. डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी गेल्या 15 वर्षात या प्रकारच्या सुमारे 4 हजार शस्त्रक्रिया केल्या असून त्यामधून त्यांनी सुमारे 4 हजार रूग्णांना नवं आयुष्य दिलं आहे.
Aurangabad: पर्यटनाच्या राजधानीची भयंकर अवस्था; सरकारी दुर्लक्षामुळे जगभर ‘शोभा’, VIDEO
अखिल भारतीय महिला सेवा संघ नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी आर्थिक मदत करतो. या संघटनेतर्फे देशभरात 34 सेंटर चालवले जातात. यामाध्यमातून वर्षभरात 5 हजारपेक्षा जास्त रूग्णांना मदत केली जाते. या मुलांसाठी लागणारी स्पीच थेरेपी, डेंटल ट्रिटमेंट, ऑर्थो डेंटीस्ट ट्रिटमेंट या ऑपरेशनसाठी देखील आम्ही मदत करतो. याचा आम्हाला आनंद आहे, अशी माहिती या संघटनेचे अधिकारी दुष्यंत यांनी दिली आहे. असा करा संपर्क….. दहिफळे मेट्रो फोर्निक्स हॉस्पिटल, जिल्ला न्यायालयासमोर अदालत रोड. या रुग्णालयाचा संपर्क क्रमांक 09850822648 रुग्णालयाची वेबसाईट www.dahiphalecosmeticurology. comरुग्णालयाचा ईमेल आयडी ujwala.dahiphale@gmail.com यावर तुम्ही संपर्क करून यासंबंधीचे अधिक माहिती मिळवू शकता.