JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबादमध्ये पुन्हा टोळक्याचा धुडगूस, फटाके फोडण्यावरून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, VIDEO

औरंगाबादमध्ये पुन्हा टोळक्याचा धुडगूस, फटाके फोडण्यावरून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, VIDEO

औरंगाबादमध्ये फटाके फोडण्यावरून मोठा वाद झाला आहे. या वादातून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबादमध्ये फटाके फोडण्यावरून मोठा वाद झाला आहे. या वादातून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टोळक्याकडून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी आणि कंबरेच्या बेल्टने मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. मारहाण झालेल्या तरुणाने पोलिसांमध्ये धाव घेतली. या टोळक्यापैकी एकही जण तरुणाच्या ओळखीचा नव्हता. दरम्यान मुकुंदवाडी पोलिसांनी टोळक्यातील सात जणांना ताब्यात घेतलं असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे. फटाके फोडण्यावरून हा तरुण आणि टोळक्यात वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. रात्री 11.30-12.00 च्या सुमारास हा राडा झाला. बेदम मारहाण झाल्यामुळे हा तरुण पोलीस स्टेशनला जायच्या स्थितीमध्ये नव्हता. यानंतर तरुणाने आज सकाळी पोलिसांना माहिती दिली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करत 7 जणांना अटक केली आहे.

याआधीही औरंगाबादमध्ये टोळक्याकडून एकमेकांच्या अंगावर फटाके फेकून फोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील खामगाव येथे मुलांच्या तीन वेगवेगळ्या गटात तुफान फटाकेबाजीचा स्टंट पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये फटाके फोडणारे तरुण एकमेकांच्या अंगावर फटाके फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांना माहिती मिळताच या टोळक्याने तिथून पळ काढला. फटाक्यांसोबत मस्ती, ठाण्यानंतर औरंगाबादमधील धक्कादायक VIDEO समोर…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या