JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad Crime : औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयासमोर महिलेने घेतले पेटवून, नवऱ्याचा जाच असल्याची दबक्या आवाजात चर्चा

Aurangabad Crime : औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयासमोर महिलेने घेतले पेटवून, नवऱ्याचा जाच असल्याची दबक्या आवाजात चर्चा

औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर एक गंभीर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 01 सप्टेंबर : औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर एक गंभीर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुपारी 12 च्या दरम्यान एका महिलेने स्व:ताला थेट पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत काही क्षणात स्वतःला पेटवून घेतले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेला सध्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेच्या घरी नेहमी भांडणे असल्याची माहिती आहे. या घटनेमागे कौटुंबिक कारण असल्याचे सांगण्यात आले. या महिलेचे आणि पतीचे बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र आज असे काय घडले की एकाएकी महिलेने स्वतःला पेटवून घेतलं, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे ही वाचा :  पुणे : नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न, चौथ्या मजल्याहून कोसळून मृत्यू, विचलित करणारं दृश्य

संबंधित बातम्या

सध्या घाटी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत, पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच अशी घटना घडल्याने शहरात काही काळ खळबळ माजली. या महिलेने थेट पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोरच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरु आहे. तर या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  शेळी चोर समजून 2 तरुणांना गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्यांनी केली बेदम मारहाण, गोंदियाचा LIVE VIDEO

औरंगाबादमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील गेवराई बार्शी येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून एका स्वयंघोषित पत्रकार, पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून आपल्यावर दबाव आणला जात असून, त्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या केली असल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. शेषराव सोमाजी खुटेकर (वय 65 वर्षे, रा.गेवराई बार्शी,ता.पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.  

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या