प्रातिनिधीक फोटो
वाळूज, 11 मार्च: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या वाळूज (Waluj) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथील द्वारकानगरी परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेसोबत दोन जणांनी धक्कादायक कृत्य केलं आहे. आरोपींनी भाड्यानं खोली मागायच्या बहाण्यानं महिलेच्या घरात शिरून तिला बेदम मारहाण (woman beaten up by 2 accused) केली आहे. पीडित महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत, दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. अभिषेक दत्तात्रय जगताप (32, रा. शेवगाव) आणि धीरज चंद्रशेखर काळे (रा. एमआयडीसी पैठण) असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. घटनेच्या दिवशी 10 मार्च रोजी दोन्ही आरोपी घर शोधात द्वारकानगरी बजाजनगर परिसरात आले होते. यावेळी ‘डबल रुम भाड्याने देणे आहे’ अशी पाटी वाचून दोन्ही आरोपी विचारपूस करण्यासाठी पीडित महिलेच्या घरात शिरले होते. यावेळी पीडित महिला घरी एकट्याच होत्या. दोन्ही खोल्या तीन हजार रुपये भाड्याने देण्याबाबत साहेबांशी बोलणं झाल्याचं आरोपींनी महिलेला सांगितलं. हेही वाचा- शेजारील तरुणावर जडलं प्रेम; महिलेनं प्रियकराच्या मदतीनं शिक्षक पतीचा वाजवला गेम तेव्हा पीडित महिलेनं ‘साहेब आल्यावर या’ असं सांगितलं आणि आतल्या खोलीत निघून गेल्या. यावेळी दोन्ही आरोपी महिलेच्या मागोमाग घरात शिरले. यातील एकाने पटकण दाराची कडी लावली. तर दुसऱ्यानं महिलेचे केस पकडून तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपींनी चापट आणि बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पीडितेनं प्रतिकार करताना आरोपीच्या डोक्यात गॅसची जाळी मारली आणि बचावासाठी आरडाओरड सुरू केला. हेही वाचा- दोस्तीत कुस्ती! मित्राच्या बायकोवर होता डोळा,अमरावतीत तरुणानं जीवलगाचा घोटला गळा महिलेचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पीडितेच्या घराकडे धाव घेतली. घरात घडत असल्याचा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. वाळूज पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. संबंधित प्रकार गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला आहे. दिवसाढवळ्या दोन जणांनी घरात घुसून महिलेला मारहाण केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.