JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अबब! औरंगाबादकरांनी वर्षभरात रिचवली 44 लाख लिटर बिअर, पाहा Video

अबब! औरंगाबादकरांनी वर्षभरात रिचवली 44 लाख लिटर बिअर, पाहा Video

औरंगाबादकरांनी वर्षभरात 44 लाख लिटरपेक्षा जास्त बिअर रिचवल्याची माहिती उघड झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 22 डिसेंबर : नव्या वर्षाची चाहूल आता लागलेली असून त्याचवेळी 2022 मध्ये काय घडलं याची माहिती समोर येऊ लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 44 लाख 67 हजार 110 लिटर विक्री झाल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या विक्रीमध्ये 18 लाख 13 हजार 739 लीटर इतकी वाढ झालीय. त्याचबरोबर अवैध दारू विक्री आणि ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं 800 गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात अवैधरीत्या दारू विक्री करण्यास आणि अवैधिकरित्या दारू पिण्यास बंदी आहे. या प्रकारे दारू विकणारे ढाबे आणि तिथं येणाऱ्या तळीरामांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे. या वर्षभरातात या प्रकरणात तब्बल 800 गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये 155 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून  3 कोटी 34 लाख 70 हजार 60 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटी 45 लाख 54 हजार 142 रुपये एवढा जास्त आहे. Aurangabad : … तिच्या जागी पोलीस आले आणि रोड रोमियोची उडाली धांदल! ढाब्यावरती अवैध रित्या मद्य विक्री करण्यास परवानगी नाही. त्यानंतरही ही विक्री केली जाते.  परवानगी नसताना दारू विक्री करणाऱ्या ढाबे मालकांवरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 68 आणि 84 अंतर्गत मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कारवाई सुरू आहे.

नागरिकांना दारू पिण्याची इच्छा असेल तर त्यांनी परवाना असलेल्या ठिकाणाहूनच दारू विकत घ्यावी अन्यथा विक्री करणाऱ्या वर आणि विकृत घेणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या