JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / प्रेमासाठी काहीपण; महिला पोलिसाने प्रियकराला केलं क्वारंटाईन

प्रेमासाठी काहीपण; महिला पोलिसाने प्रियकराला केलं क्वारंटाईन

कोरोनाचा फायदा घेत महिला पोलिसाने प्रियकराला क्वारंटाईन तर केलं मात्र त्यानंतर…

जाहिरात

प्रेम प्रकरणाच्या वादातून आरोपीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 14 जुलै : सध्या कोरोनाच्या कहरात लोक अत्यंत वैतागले आहे, केव्हा एकदा कोरोना जातो आणि सुरळीत आयुष्य सुरू होतं, याकडे लोक डोळे लावून बसले आहेत. त्याच एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. महिला पोलीस कर्मचारी रेश्मा (नाव बदललं आहे) ही नागपूर शहर पोलीस दलात एका विशेष शाखेत कार्यरत आहे. तिच्या कार्यालयीतल एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर इतर सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात सांगण्यात आले. यावेळी रेश्माच्या संपर्कात तिचा प्रियकरही आला. दुरावा सहन होत नसल्याने तिने चक्क प्रियकराला क्वारंटाईन करुन घेतलं. त्याचं झालं असं रेश्माला क्वारंटाईन करण्यास सांगितल्यानंतर तिने तिचा प्रियकर अमित (नाव बदललं आहे) यालाही कोरोनाची भीती असल्याचे सांगून पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करुन घेतलं. अमित हा केंद्र सरकारच्या एका खात्यात कार्यरत आहे. मात्र हा प्रताप उघड झाला जेव्हा पती तीन दिवसांपासून घरी आला नसल्याने अमितच्या पत्नीने शोध सुरू केला. तिने आपल्या पतीच्या नेहमी संपर्कात असलेल्या रेश्माचा पत्ता काढला. ती थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहोचली मात्र तिला अधिकारी सहकार्य करीत नव्हते. अशावेळी तिने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तिने पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्या नागपूर पोलिसात रेश्मा आणि अमितच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करुन घेण्यापूर्वी रेश्माने अमित आपला पती असल्याचे सांगितले. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या