JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बेळगावात संतप्त आदोलकांची घोषणाबाजी, केला हा आरोप तर कलम 144 लागू

बेळगावात संतप्त आदोलकांची घोषणाबाजी, केला हा आरोप तर कलम 144 लागू

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना माध्यमांसोबत बोलु दिलं जात नाही आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेळगाव, 18 डिसेंबर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्याला कर्नाटक प्रशासनाकडून अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. टिळकवाडी मैदानाच्या परिसरात 144 कलम लागु करण्यात आले आहे. तसेच यामुळे याठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. सकाळपासुन अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच काही महिलांनी याठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. याठिकाणी महामेळाव्याला जावु दिलं जात नाही आहे. कर्नाटक सरकार दडपशाही करते आहे, अशा भावना याठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केल्या. दरम्यान, या घोषणाबाजी दरम्यान, महिला कार्यकर्त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना माध्यमांसोबत बोलु दिलं जात नाही आहे. यामुळं आमचा आवाजसुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. कर्नाटक सरकारच्या अधिवेशन काळात दरवर्षी महामेळावा होत असतो. मात्र, यावर्षी परवानगी दिली नसल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकं संतप्त झाल्याचं पाहायला मिळते आहे. हेही वाचा - winter session : “मला धमकी आली तेव्हा सरकारने….” नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

अजितदादांनी मांडला कर्नाटक वादाचा मुद्दा -

दरम्यान, राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. त्यात आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागावर वादाबद्दल दिल्लीत बैठक बोलावली होती. मुळात सीमाभागाच्या मुद्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. 6 डिसेंबरला चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे जाणार होते पण महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्यांनी टाळलं. त्यानंतर दोन्हीकडून नेते जाणार होते. कर्नाटकमध्ये कुणाला अडवणार नाही, असं अमित शहांसमोर ठरलं होतं. पण आमदारांना कर्नाटकने का रोखलं, हे अजिबात आपण खपवून घेऊ नये, असं अजितदादांनी ठामपणे सांगितलं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या