JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Akola Special Report : शेतकामांना वेग! पावसाच्या तोंडावर बाजारात दोरखंडाची वाढली मागणी

Akola Special Report : शेतकामांना वेग! पावसाच्या तोंडावर बाजारात दोरखंडाची वाढली मागणी

पावसाळा तोंडावर आल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे अकोल्याच्या बाजारात शेतकामांना लागणाऱ्या दोरखंडाची मागणी वाढलेली आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे दोरखंड (Agricultural Rope) शेतकरी विकत घेतना दिसत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला, 9 जून : पावसाळा म्हटलं की, शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीच्या कामांना वेग येतो. पावसाळा सुरू होण्याच्या वाटेवर आहे. म्हणून शेतीच्या कामासाठी लागणारे वस्तू, अवजारे बाजारात विक्रीला आली आहेत. नागरणे, वखरणे आणि पेरणीच्या कामांना लागणाऱ्या वस्तू (Agricultural Rope) आठवडी बाजारात विकायला आल्या आहेत. (Demand for agricultural rope increased in Akola market) शेतीसाठी आणि बैलजोडीसाठी लागणाऱ्या वस्तू दोरी, नाथा दोरी, मोरके, पट्या, वार्ती, केसारी, गेठे, घागर माळ, मुसके, कसांडी, बेरड्या, लोखंडी घाटर, घुंगरू,चराट, टायगर दोरी, रोटो दोरी, रेशम दोरी, नायलॉन दोरी, अशा अनेक प्रकारचे दोरखंड (Agricultural Rope) विक्रीला आले आहेत. त्यामुळे बाजारात या वस्तू घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. वाचा :  विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! उन्हाळ्याची सुट्टी संपली; राज्यात ‘या’ तारखेपासून सुरु होतील सर्व शाळा अकोला जिल्ह्यातील कापशी या गावांमध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये शेतीच्या कामाला लागणाऱ्या वस्तू विक्रीला आल्या आहेत. या गावातील आठवडी बाजारामध्ये बैलांना लागणाऱ्या साहित्याचे रमेश ताकझुरे यांचे दुकान आहे. येत्या काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होईल, त्यासाठी आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण भागात शेतीच्या साहित्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे असलेल्या बैलजोडीला लागणारे साहित्य या आठवडी बाजारमध्ये मिळत आहे. वाचा :  Aurangabad : ‘फ्रिज अन् पाण्याच्या जार’मुळे कुंभार व्यावसायिक कोलमडला, ऐका त्यांच्याच तोंडून ‘ही’ कर्म कहाणी! यासंदर्भात सिंधखेडचे विक्रेते रमेश ताकझुरे म्हणाले की, “मी मागील 15 वर्षांपासून आठवडी बाजारात शेतीला व बैलांना लागणाऱ्या वस्तू विकायला येतो. शेतीसाठी लागणाऱ्या या सर्व वस्तू माझ्याकडे असतात. आता शेतीच्या कामाला सुरवात झाली आहे, त्यामुळे अनेक शेतकरी वस्तू खरेदी करायला येत आहेत. तसा तर हा धंदा बाराही महिने चालणारा आहे. पण पावसाळ्यात या वस्तुंना जास्त मागणी असते.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या