JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भीतीवर मात करत पटकावले गोल्ड! नगरचा अथर्व बनला किक बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन, Video

भीतीवर मात करत पटकावले गोल्ड! नगरचा अथर्व बनला किक बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन, Video

अथर्वची लढत जोर्डनच्या खेळाडूविरुद्ध झाली. अंतिम सामन्यात चमकदार विजय मिळवून त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 14 नोव्हेंबर : नगर च्या अथर्व साळे खेळाडूने नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्‍सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली. वर्ल्ड असोसिएशन ऑफ किक बॉक्‍सिंग यांच्या वतीने दिल्ली येथील तालकोट स्टेडियमवर स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं, अथर्वची लढत जोर्डनच्या खेळाडूविरुद्ध झाली. दरम्यान अंतिम सामन्यात चमकदार विजय मिळवून त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत भारतासह जोर्डन, साउथ कोरिया, जर्मनी या देशांचा समावेश होता. या स्पर्धेत 17  ते 18 वयोगटातील 81 किलो पेक्षा कमी वजनाचे खेळाडू सहभागी झाले होते.  कठोर परिश्रमाच्या जोरावर अथर्वने देशाचा गौरव वाढविला आहे. या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातून 22 खेळाडू सहभागी झाले होते. हा समान मोठा होता म्हणून सर्व खेळाडूमध्ये धाकधूक होती. मात्र, खेळायचं जिंकायचं हे ठरवूनच अथर्व स्पर्धेत उतरला होता. लहान वयापासूनच खेळाची आवड आई बाबापासून लपवून स्पर्धेत उतरणारा, प्रत्येक गोष्ट आजीसोबत शेअर करणारा व बाजरीच्या भाकरीवर ताव मारणारा ह्या खेळाडूची कहाणी रोमांचकारक आहे.  अथर्व साळे हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. सध्या तो बारावीमध्ये शिकत आहे. कोणत्याही खेळाडूचा वारसा नसणाऱ्या अथर्वला अगदी लहान वयापासूनच खेळाची विशेष आवड होती. खेळामध्ये चांगल्या पद्धतीने आपण कामगिरी करू शकतो हा आत्मविश्वास त्याला अगदी पहिल्यापासूनच होता. यातून त्याने किक बॉक्सिंग स्पर्धेची तयारी सुरू केली.   भल्या मोठ्या सापांना सहज पकडणारी सर्पमैत्रीण! पाहा कसं करते ती काम, Video ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची इच्छा घराच्या आवारात इतर मुलांना किक बॉक्सिंगची तयारी करताना पाहून अथर्वमध्ये खेळाची आवड निर्माण झाली. आवडीतून नगरच्या निलेश शेलार फिटनेस क्लबमध्ये खेळाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षापासून अथर्व किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक म्हणून त्याला गणेश कुसळकर व  गोकुळ सोलाट हे लाभले. राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पदकही मिळवले. किक बॉक्‍सिंगसह ताय्कांडो  हा खेळ ही खेळत आहे. अथर्वला आता ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या