JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : ‘त्या’ घटनेनं खेळाडू बनण्याचं स्वप्न भंगलं, पहिल्याच प्रयत्नात बनला अधिकारी, पाहा कसं मिळलं यश?

Video : ‘त्या’ घटनेनं खेळाडू बनण्याचं स्वप्न भंगलं, पहिल्याच प्रयत्नात बनला अधिकारी, पाहा कसं मिळलं यश?

अ‍ॅथलॅटिक्स मैदानी खेळातून नाव कमवू पाहणाऱ्या सागरच्या आयुष्यात असे वळण आले की खेळ सोडून त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर , 26 नोव्हेंबर : सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खरतड अशा परीक्षांना सामोरं जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. नगरम धील रायताळे या छोट्याशा गावातील सागर साबळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आहे. अ‍ॅथलॅटिक्स मैदानी खेळातून नाव कमवू पाहणाऱ्या सागरच्या आयुष्यात असे वळण आले की खेळ सोडून त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागली.     अधिकारी होण्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज असतेच असं नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन सागरने घवघवीत यश संपादन केलं आहे. पहिली ते चौथी सागरचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेलं आहे.  माध्यमिक शिक्षणही छोट्याशा खेडेगावात पूर्ण केलं. त्यानंतर पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पदवीचा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले विद्यापीठात पूर्ण केला. सागरला क्रीडा स्पर्धेतही रुची होती. अ‍ॅथलॅटिक्स मैदानी स्पर्धेमध्ये त्याने उल्लेखनीय कार्य केले. त्यांची तीन वेळेस राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राज्यपातळीवर त्याने 3 वेळेस सुवर्ण तर दोन वेळेस रौप्य पदक मिळाले. Nashik : उद्योजक होण्यासाठी मिळणार मोफत प्रशिक्षण, ‘या’ पद्धतीनं घ्या लाभ आणि खेळ बंद झाला रायतळे गावचा पहिला दुय्यम उत्पादक निरीक्षक अधिकारी म्हणून सागर ओळखला जाणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेला सागरचे वडील माध्यमिक शिक्षक तर आई गृहिणी आहे. आपल्या मुलाने अधिकारी व्हावं, अशी अपेक्षा पहिल्यापासूनच सर्वांचे होती. तशी तयारी देखील सुरू होती. मात्र सागरला खेळामध्ये अधिक रुची होती. खेळात तो चांगलाच रमला होता. मात्र, खेळत असताना अचानक इजा झाली, पाठीची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे खेळणं बंद झालं, मग त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. घरची जबाबदारी दरम्यान, कोरोना सारखा महाभयंकर काळात आईवडील दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यांची प्रकृती खालावत होती. वडिलांना पुण्यात हलवण्यात आलं तर आई नगरमध्ये रुग्णालयात दाखल होती. कोरोना बरा होत नाही तोच आईवडिलांना म्युकर मायक्रोसेसने ग्रासलं. यातून वडील सुखरूपपणे बाहेर आले, मात्र, आई आजही म्युकर मायक्रोसेसचा लढा देत आहे. अशा परिस्थितीत घरात सागरच थोरला असून त्यावरच घरची जबाबदारी होती. घराची जबाबदारी पेलत सागरने मेहनतीनं अभ्यास केला. दिवसभर वेळ मिळत नव्हता तर सागर रात्री, पहाटे उठून अभ्यास करायचा. घेतलेल्या मेहनतीच आता फळ मिळालं असून पहिल्या प्रयत्नांत सागर यशस्वी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या