JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : बूट घेण्याची परिस्थिती नसतानाही तो धावला, नगरच्या सौरभनं देशासाठी पटकावलं सुवर्णपदक!

Video : बूट घेण्याची परिस्थिती नसतानाही तो धावला, नगरच्या सौरभनं देशासाठी पटकावलं सुवर्णपदक!

सौरभ जाधवने इंडो-नेपाळ चॅंपियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 27 डिसेंबर :  मुलांना मोठं होण्यासाठी आई-वडिलांची साथ आवश्यक असते. मात्र, यापैकी एकाचीही साथ नसेल तर ध्येय गाठणं कठीण वाटतं. नगर   जिल्ह्यातील सौरभ जाधवचे देखील असेल झाले. कौटुंबिक कलहातून सौरभ लहान असताना वडील घर सोडून गेले. आईने हलाखीच्या परिस्थिती सौरभला मोठं केलं. सौरभनेही मेहनत, चिकाटीने ध्येयासाठी प्रयत्न केले. यातून त्याने  इंडो-नेपाळ चॅंपियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. बिकट परिस्थितीत कस मिळवलं यश, पाहुयात. लहानपणीपासून आईला संघर्ष करताना सौरभने पाहिलं होत, आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण कुठे तरी नोकरी करावी असे त्याला वाटत असे. सौरभला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. यातून क्रीडा विभागातून आपण सैन्यात भरती व्हावं यासाठी तो प्रयत्न करू लागला. मात्र त्या ठिकाणी ट्रेनरने सौरभला अपमानित केलं.यावर सौरभने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद वयाच्या 20 व्या वर्षी सौरभाने धावण्याला सुरुवात केली. सुरुवातीला सर्वांनी नावे ठेवले पळून करियर होत का, असे अनेक जण म्हणाले. मात्र सौरभने याकडे दुर्लक्ष केलं. परिस्थिती बिकट असल्याने बूट घेण्यासाठी सुद्धा पैसे सौरभकडे नव्हते. मात्र, अनवाणी पायाने सराव करत सौरभ ने जिद्दी चिकाटी सोडली नाही. तो स्पर्धेमध्ये सहभागी होत गेला. जिंकत गेला. 72 किलोमीटर अंतर 14 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करून त्याने इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. 12 किमी, 32 किमी हाफ मॅरेथॉन, गणेगाव मॅरेथॉन 21 किमी, पुणेकर हाफ मॅरेथॉन 5 किमी स्पर्धांमधून सौरभ आजवर धावला आहे.   हा चान्स सोडू नका! ग्रामीण भागातील तरूणांना उघडणार मोठ्या कंपनीची दारं सुवर्णपदकाची कमाई  अनेक बक्षिसे व मेडल्स त्याच्या नावावर जमा आहेत. नुकत्याच झालेल्या नेपाळ येथील इंडो-नेपाळ चॅंपियनशिप 5000 मीटर रनिंग सिनिअर गटामध्ये नगर तालुक्यातील अकोळनेर येथील सौरभ जाधवने सुवर्णपदक पटकावले. सौरभ सध्या कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे.   18 व्या वर्षीच बनली अनाथांची ताई, प्रेरणादायी प्रवास वाचून वाटेल अभिमान! Video लोक सहभागातून स्पर्धा मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होताना तो लोक सहभागातून लागणारी फी जमा करतो. कुटुंबासाठी छोटी नोकरी करत आपला सराव सुरू ठेवतो. स्पर्धेत सहभागी होतो, अनेकांना मार्गदर्शन करतो. सध्या तो पुण्यातील हडपसरला राहण्यासाठी आहे. पुढे जाऊन ग्रामीण भागातून खेळाडू घडण्याचं त्याच स्वप्न आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या