JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुलीचा हात का धरला? विचारत निवृत्त जवानाला लोखंडी रॉडने मारहाण, उपचारदरम्यान मृत्यू

मुलीचा हात का धरला? विचारत निवृत्त जवानाला लोखंडी रॉडने मारहाण, उपचारदरम्यान मृत्यू

जातेगावमधील मारहाणीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 12 जून : पारनेर तालुक्यातील जातेगावमधील मारहाणीत जखमी झालेल्या सेवानिवृत्त जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनोज संपत औटी असे वृत्त सेवानिवृत्त जवानाचे नाव आहे. या सेवानिवृत्त जवानाला सोमवारी मारहाण झाली होती. मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत जवानाचा भाऊ तुषार औटी यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जातेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ निवृत्त जवान मनोज उभा होता. त्यावेळी तेथे येऊन सौरव पोटघन, विक्की पोटघन आणि अक्षय पोटघन यांनी मुलीचा हात का धरला? असं विचारत मनोज याला लोखंडी पाईप आणि दगडाने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यामध्ये सेवा निवृत्त जवान गंभीर झाला होता. जखमी अवस्थेत त्याला नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा - जालना हादरलं! जन्मदात्या आईचा खून करून मामाला केला फोन, दारुड्या मुलाचं कृत्य दरम्यान, या प्रकरणी तिघांवर सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या