JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंसह आदित्य आणि सुप्रिया सुळेंच्या अडचणीत वाढ; निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली...

उद्धव ठाकरेंसह आदित्य आणि सुप्रिया सुळेंच्या अडचणीत वाढ; निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली...

निवडणूक प्रतिज्ञापत्रातील चुकीमुळे मोठी शिक्षा होऊ शकते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर : महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि एनसीपी खासदार सांसद सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व नेत्यांवर निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती देण्याचा आरोप आहे. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता निवडणूक आयोगाने (Election Commission) याचा तपास सीबीडीटीला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नेत्यांशिवाय गुजरात आमदार नाथाभाई ए पटेल यांच्या विरोधातही निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि त्यांच्यासोबतच्या एनसीपीच्या नेत्यावर आरोप आहे की यांनी निवडणुकीच्यावेळी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी चुकीची माहिती असून काही रकाने अर्धवट आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्त्याने आपल्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी काही कागदपत्रं सोपवली आहेत. ज्यावरुन या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती असल्याचे समोर आले आहे. या डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाने याचा तपास सीबीडीटीला पाठविली आहे. हे ही वाचा- VIDEO : आक्रोश..एका क्षणात अख्खं गाव गेलं पाण्याखाली; पुरात दोघेजण गेले वाहून एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या