JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रायगडमधील RCF कंपनीतील एसीने घेतला 3 कर्मचाऱ्यांचा बळी, तिघे गंभीर जखमी

रायगडमधील RCF कंपनीतील एसीने घेतला 3 कर्मचाऱ्यांचा बळी, तिघे गंभीर जखमी

जखमींची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 19 ऑक्टोबर : रायगडमधील अलिबागजवळ असलेलं आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 4 जणं जागीच ठार झाले आहे. तर तिघेजणं जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसीचा कॉम्प्रेसर फुटल्याने कंपनीत स्फोट झाला आणि या स्फोटात तब्बल 3 जणांचा बळी गेला. याची माहिती कळताच तातडीने रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील थळ आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट झाला असून या अपघातात 3 जण जागीच ठार तर दुर्घटनेत तिघे जखमी झाले आहे. जखमींवर आरसीएफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एसी प्लांटमध्ये बिघाड झाल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरसीएफ कंपनीतील स्फोट दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलिबाग तहसीलदार यांची कंपनीत घटनास्थळी दाखल झाले. बातमी अपडेट होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या