सातारा, 30 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) निष्ठा रॅली सुरु केली. हा दौरा विशेषकरुन बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात घेतला जात आहे. आदित्य ठाकरेंची पहिल्या टप्प्यातील शिवसंवाद यात्रा पार पडली आहे. आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 2 ऑगस्ट शिवसंवाद यात्रा साता-याच्या पाटण तालुक्यात येणार आहे. या तालुक्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj desai) हे सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून ते शंभूराज देसाई त्यांच्यासोबत आहेत. आता त्यांच्याच मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेत आव्हान देणार आहेत. याला देसाई कसं उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. शंभूराज देसाईंच्या विरोधात कदमांना ताकद देणार शंभूराज देसाईंच्या बंडानंतर पाटण मतदारसंघातून अनेक संतप्त प्रतिक्रीया समोर आल्या आहेत. इतर मतदारसंघाप्रमाणे इथं देसाईंच्या विरोधात लोक उतरले नसले तरी इतर माध्यमातून शिवसैनिकांचा रोष नक्कीच पाहायला मिळाला आहे. यामुळे शंभूराज देसाईंना आव्हान देण्याच्या दृष्ठीने आदित्य ठाकरेंचा दौरा असल्याचं सांगितलं जातय. सध्या शिवसेनेचे पाटण-कराडचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम आहेत. हर्षद कदम हे पाटण तालुक्यातील मल्हारपेठचे राहणारे असल्यामुळे शंभूराज देसाईंना भविष्यात कडवी झुंज हर्षद कदम देतील, अशा चर्चा मतदारसंघात सुरु आहेत. मोठी बातमी : ‘ती’ ऑडिओ क्लिप भोवली; संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्तानं हर्षद कदमांना ताकद दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हर्षद कदम यांना या कारणामुळेच जिल्हाप्रमुख पद दिलं गेल्याच्या चर्चा आहेत. शंभूराजेंना आमदारकीच्या निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत अडचणीत आणून त्यांचा पराभव करण्याची जबाबदारीसुद्धा हर्षद कदमांवर देण्यात आल्याचं शिवसेनेच्या गोटातून बोललं जातय. सातारा जिल्ह्यातील पक्षाचे दोन्ही आमदार सोडून गेल्यानंतर आदित ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा सातारा दौरा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा आहे. असा असेल शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा दुसरा टप्पा येत्या 1 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान 1 आणि 2 ऑगस्ट रोजी ही ‘शिव संवाद’ यात्रा निघणार आहे. तर पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा पूर्ण केली आहे.