JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / पुण्यासह 5 जिल्ह्यांनी वाढवलं ठाकरे सरकारचं टेन्शन; राज्याच्या सरासरी Positivity rate पेक्षा जास्त दर

पुण्यासह 5 जिल्ह्यांनी वाढवलं ठाकरे सरकारचं टेन्शन; राज्याच्या सरासरी Positivity rate पेक्षा जास्त दर

गेल्या आठवड्यापेक्षाही या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त वाढला आहे.

0110

एकिकडे राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण तरी राज्यावरील कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.

जाहिरात
0210

फक्त पाच जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन वाढवलं आहे. या पाच जिल्ह्यांमधील कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हीटी रेटपेक्षाही जास्त आहे.

जाहिरात
0310

पॉझिटिव्ही रेट म्हणजे एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचं प्रमाण आणि याच पॉझिटिव्ही रेटवर अनलॉकसंबंधी नियम अवलंबून आहेत.

जाहिरात
0410

27 जून ते 3 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्याचा आठवड्याचा सरासरी पॉझिटिव्ही रेट 4.50 टक्के आहे.

जाहिरात
0510

कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, पुणे या पाच जिल्ह्याचा आठवड्याचा पॉझिटिव्ही रेट हा राज्याच्या सरासरी पॉझिटिव्ही रेटपेक्षाही जास्त आहे.

जाहिरात
0610

याच आठवड्यात सोलापुरातील पॉझिटिव्हिटी रेट हा  10.24 टक्के आहे. याआधीच्या आठवड्यात म्हणजे 20 ते 26 जूनला हा दर 7.37 टक्के होता.

जाहिरात
0710

साताऱ्यातील आठवड्याचा पॉझिटिव्ही दरही गेल्या आठवड्याच्या 7.75 टक्क्यांवरून आता  9.14 टक्क्यांवर पोहोचला आहे.

जाहिरात
0810

त्यानंतर सांगलीचा पॉझिटिव्ही रेट हा 8.81 टक्के आहे.

जाहिरात
0910

पुण्यातील पॉझिटिव्ही रेट हा गेल्या आठवड्यापेक्षा किंचितसा वाढला आहे. पण तरी यामुळे चिंता वाढली आहे. 7.2  टक्क्यावरून तो 7.68 टक्क्यांवर आला आहे.

जाहिरात
1010

फक्त पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर आता कोकणानेही चिंता वाढवली आहे.  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अनुक्रमे 7.88, 7.29, 6.55 टक्के पॉझिटिव्ही रेट आहे, जो सरासरीपेक्षा जास्त आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या