दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी काही सरपंचानी गाव कोरोनामुक्त करुन दाखवलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कोमल करपे या युवा सरपंचांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. कोण आहेत कोमल करपे ?
कोमल करपे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच असून वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी सरपंचपद भूषविले. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरुन अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी विजय मिळवला. बी.एस.सी. बॅटनी या विषयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना राजकारणात संधी मिळाली आहे. कोरोना काळात गाव कोरोनामुक्त केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. अंत्रोळी गावची लोकसंख्या 2 हजार 298 इतकी आहे
2 हजार 298 पैकी 300 लोकांचे लसीकरण पूर्ण झालं असून गावात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीद्वारे गाव केले कोरोनामुक्त.
गावातील लोकांना विश्वासात घेऊन प्रसंगी त्यांना कायद्याचा धाक दाखवून गाव कोरोनामुक्त केलं आहे. गावकऱ्यांच्या मदतीने आणि त्यांना विश्वासात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्यात आलं आहे.