30 सप्टेंबर : रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची आरपीआयमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आरपीआयचे नेते अविनाश महातेकर यांनी ही माहिती दिलीये. मात्र दुसरीकडे खुद्ध रामदास आठवले यांनी तुर्तास डांगळेंवर कारवाई करणार नाही त्यांनी परत यावं असं आवाहन केलंय.
महायुती फुटल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यांचा निर्णय चुकीचा आहे असं सांगत रिपाइंचे नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. अर्जुन डांगळे यांच्या भूमिकेमुळे आठवले गटात फूट पडली. अखेरीस आज सकाळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अशी माहिती रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांनी दिली. मात्र दुसरीकडे रिपाइं गटात आता मतभेद चव्हाट्यावर आले आहे. डांगळे यांची एकीकडे हकालपट्टी करण्यात आली तर दुसरीकडे खुद्द रामदास आठवले यांनी त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच अर्जुन डांगळेंनी रिपाइंमध्ये परत यावं असं आवाहनही आठवलेंनी केलं. निवडणुकीनंतर शिवसेना, भाजप आणि रिपाइंला एकत्र यावं लागेल. शिवसेनेनं आमच्यासोबत यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे असंही आठवले म्हणाले. तसंच भाजपकडून आम्हांला 3-4 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे असंही आठवलेंनी सांगितलं. तर रामदास आठवलेंनी शिवसेनेसोबत यावं असं आवाहन अर्जुन डांगळे यांनी केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++