29 ऑक्टोबर : एकीकडे शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. उद्योग, क्रीडा, सिने, साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलंय. तर तिकडे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण दिलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केला आणि कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही फोन केला आणि शपथविधीला येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र यावेळी युतीसंदर्भात चर्चा झाली नसल्याचं कळतंय.
विशेष म्हणजे या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळाही दिमाखदार होणार आहे. त्यासाठी उद्योगपती, ऑलिम्पिकविजेते, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, साहित्यिक, बॉलीवुड अभिनेत, अशा सर्व मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय.
हे दिग्गज येणार शपथविधीला - उद्योगपती रतन टाटा - उद्योगपती मुकेश अंबानी - उद्योगपती अनिल अंबानी - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू सुनील गावसकर - क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर - हॉकीपटू धनराज पिल्ले - हॉकीपटू युवराज वाल्मिकी - नेमबाज अंजली भागवत - संत साहित्यचे अभ्यासक सदानंद मोरे - साहित्यिक राजन खान - अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन - अभिनेता सलमान खान +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++