JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / World's expensive food : जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर

World's expensive food : जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर

या पदार्थांमध्ये वापरली जाणारी सामग्री, ते बनवण्याची आणि सर्व्ह करण्याची पद्धत यामुळेच हे पदार्थ जगातील सर्वात महाग पदार्थ आहेत.

0106

आपण चांगल्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाऊन खावं असं प्रत्येकाला वाटतं. मग एखादा पदार्थ खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले तरी चालतील. कधी कधी अशा हॉटेल्समधील पदार्थांची किंमत वाचूनच आपण थक्क होतो. मग तर जगातीलअशाच महागड्या पदार्थांची किंमत वाचून तर तुम्हाला चक्करच येईल.

जाहिरात
0206

अमेरिकेच्या Serendipity 3 रेस्टॉरंटमध्ये Quintessential Grilled Cheese सँडविच मिळतं. गोल्डन सँडविच म्हणूनही हे ओळखलं जातं. याची किंमत 16 हजार रुपये आहे. यावर सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे.  तसंच यात जगातील दुर्मिळ असं  Caciocavallo Podolico cheese वापरण्यात आलं आहे.

जाहिरात
0306

जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राइज 200 डॉलर्स म्हणजे जवळपास 14,916 रुपयांना आहे. अमेरिकेच्या Serendipty3 रेस्टॉरंटमध्ये क्रेमे डे ला क्रेमे पोमे फ्राइट्स नावाने हे फ्रेंच फ्राइझ मिळतात. यामध्ये ऑर्गेनिक जर्सी गायींपासून तयार केलेलं 100% ग्रास फ़ेड क्रीम वापरण्यात आलं आहे. 

जाहिरात
0406

नेदरलँडच्या डी डॉल्टन्स रेस्टॉरंटमध्ये पाच हजार पाउंड म्हणजेच 4.50 लाख रुपयांना एक बर्गर मिळतो. या बर्गरमध्ये सोन्याचं पान लावण्याच आलं आहे, याच कारणामुळे याची किंमत इतकी जास्त आहे. हे बर्गर द गोल्डन ब्वॉय नावानं प्रसिद्ध आहे.

जाहिरात
0506

दुबईतील Bombay Borough रेस्टॉरंटमध्ये रॉयल बिर्याणी किंवा गोल्ड बिर्याणी खायला मिळेल. ही बिर्याणी 23 कॅरेट सोन्यानं सजवली जाते. बिर्याणीच्या एका प्लेटची किंमत 20 हजार रुपये आहे. पण ही एक प्लेट तुम्ही सहा जणांमध्ये खाऊ शकता.

जाहिरात
0606

जेवण झाल्यावर आपल्यापैकी बहुतेकांना आईस्क्रिम खायला आवडतं. जगातलं सर्वांत महागडं आईसक्रीम आहे 840 डॉलर्स म्हणजे सुमारे 60 हजार रुपयांना. दुबईत ब्लॅक डायमंड म्हणून मिळणाऱ्या या आईसक्रीममध्ये 23 कॅरेट खाण्यायोग्य सोनं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या