JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Breastfeeding Week : आईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद?

Breastfeeding Week : आईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद?

1 ते 7 ऑगस्ट हा World Breastfeeding Week आहे. बाळाला स्तनपान किती गरजेचं आहे ते जाणून घेऊयात.

0108

1 ते 7 ऑगस्ट हा स्तनपान जनजागृती सप्ताह असतो. सध्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे आणि नवजात बालकासाठी रोगप्रतिकारशक्ती मिळते ती आईच्या दुधापासून. 

जाहिरात
0208

स्तनपान हे बाळाला आजारांशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते आणि आजारांपासून दूर ठेवण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावितात.

जाहिरात
0308

आईच्या दुधात असलेले लोक्टोफोर्मिन तत्व हे आईच्या स्तनापर्यंत थोरॉसिक डक्ट नळीतून पोहोचते. बाळाच्या नाक आणि घश्याच्या भागात यामुळे रोगप्रतिरोधी त्वचा तयार होते.

जाहिरात
0408

आईच्या दुधात प्रथिने, चरबी, लोह, जीवनसत्त्वे यासारख्या सर्व प्रकारच्या पौष्टिक मूल्यांचा समावेश असतो.

जाहिरात
0508

आईचे दूध बाळाला अतिसार, श्वसन संसर्गासारख्या आजारांपासून वाचवते. बाळाला अशक्तपणा येत नाही.  स्तनपान केल्याने बाळाला कानाचे संसर्ग, न्यूमोनिया आणि मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होते.

जाहिरात
0608

फॉर्म्युला मिल्कपेक्षा आईचे दूध हे बाळाच्या वाढीकरिता सर्वोत्तम ठरते. बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणं सर्वोत्तम कारण त्यामुळे पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षण मिळतं तसेच आईचे दूध पचायला सोपं असतं आणि बद्धकोष्ठता होत नाही. त्यामुळे बाळाच्या आतड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

जाहिरात
0708

तज्ज्ञांच्या मते शारीरिक वाढ आणि मेंदूच्या विकासासह रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात आईचं दूध खूप महत्वाची भूमिका निभावतं. आईच्या दुधात इम्युनोग्लोब्युलिन (प्रथिने जे संक्रमणास विरोध करतात), पांढऱ्या रक्त पेशी आणि इतर अनेक प्रतिकारशक्ती वाढवतात.

जाहिरात
0808

स्तनपान करणाऱ्या महिलांनी आहारात फ्लॅक्स सीड्स, दही, अंडी, ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. प्रथिने तसेच पुरेसे जीवनसत्व, कॅल्शियम, व्हिटामिन डी, लोह, फॉलिक अॅसिड हे महत्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आहारात समावेश असावा तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या