JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / महिलांना होणारा ‘हा’ आजार प्रोबियोटिक्सने होतो कमी; या पद्धतीने घेतल्यासच फायदा

महिलांना होणारा ‘हा’ आजार प्रोबियोटिक्सने होतो कमी; या पद्धतीने घेतल्यासच फायदा

महिलांना योनिमार्गात संसर्ग (Infection) झाला असेल तर, प्रोबियोटिक्सयुक्त आहार घ्यायला हवा.

0107

प्रोबियोटिक्सचा वापर आता खूप लोकप्रिय होत आहे. संसर्ग टाळण्यासाठी याचा वापर केला जात आहे. पचन व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी हे वापरलं जातं. तस पाहिल तर, प्रोबायोटिक्स हे हेल्दी बॅक्टेरिया कॅरी करतात. त्यामुळे आपलं जीवाणूंपासून संरक्षण होतं.

जाहिरात
0207

तज्ज्ञांच्या मते प्रोबायोटिक्स केवळ आपल्या पोटासाठीच नाही तर, योनीसाठी देखील खूप फायदेशीर असल्याचं सिद्ध होत आहे. शास्त्रज्ञांच्यामते याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आणखीन संशोधनाची आवश्यकता आहे.

जाहिरात
0307

न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या हेल्थ सायन्स विभागाच्या डॉ. मिंडी हार्ड यांच्यामते, गेल्या काही वर्षांत यासंदर्भात आश्वासक असं संशोधन केलं गेलं आहे. प्रोबायोटिक्स PH लेव्हल बॅलन्स बिघडला असेल तर, तो ठिक करण्यात आणि उपचार करण्यास खूप प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे.

जाहिरात
0407

खरं तर, योनीमध्ये जवळजवळ 50 प्रकारचे मायक्राब्‍स म्हणजे सुक्ष्मजंतू असतात ते बऱ्यापैकी बाह्य संसर्गापासून बचाव करण्यात आणि योनी निरोगी ठेवण्यासाठी काम करतात. अशा परिस्थितीत जेव्हा असुरक्षित संभोग,हार्मोनल चेन्ज, मासीक पाळी, अस्वच्छता अशा परिस्थितीत मायक्राब्‍स सक्रिय होतात आणि योनीला संरक्षण देतात.

जाहिरात
0507

वजायनल इन्बॅन्स झाल्यास योनीतून खराब वास यायला लागतो, स्त्राव येणं, खाज सुटणे असे त्रास होतात. हे बॅक्‍टीरियल इन्फेक्‍शन,यीस्‍ट इन्फेक्‍शन आणि यूटीआय इन्फेक्शनची लक्षणं आहेत.

जाहिरात
0607

तज्ज्ञांच्या मते योनिमार्गाचा PH बॅलन्स ठेवण्यासाठी आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात दही किंवा प्रोबियटिक्स कॅप्सूलचा समावेश केला पाहिजे. 1996 साली करण्यात आलेल्या संशोधनानुसार ज्या महिलांनी आपल्या आहारात जास्त प्रोबायोटिक्स घेतले त्यांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला नाही.

जाहिरात
0707

प्रोबियटिक्स काही प्रमाणात यामध्ये फायदेशीर ठरू शकतात. मात्रा योनीच्या संसर्गात फक्त प्रोबायोटिक्स घेण्यानेच फायदा होतो असं नाही तर, स्वच्छताही महत्वाची आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या