JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / फक्त 'टिक मार्क'ने केली नवऱ्याची पोलखोल; बायकोने केला सॉलिड जुगाड

फक्त 'टिक मार्क'ने केली नवऱ्याची पोलखोल; बायकोने केला सॉलिड जुगाड

काय वाटतं घरात पती की पत्नी कोण जास्त कामं करत असेल? खरंतर यावर कोणीही निर्णय देऊ शकत नाही पण, एका पत्नीने थेट सोशल मीडियावरच पतीची पोलखोल केलीये.

0107

पती-पत्नीमध्ये घरकामावरून वादावादी असतेच. पण, नेमकं कोण जास्त काम करतं याचा शोध घेणं कठीणच असतं. यासाठी एका महिलेने एक शक्कल लढवली आणि महिन्याच्या शेवटी फेसबूकवर थेट नवऱ्याने केलेल्या कामांची यादी देखील टाकली.

जाहिरात
0207

ऑस्ट्रेलिया मध्ये राहणाऱ्या या महिलेने फेसबुकवरील आळशी पतीसाठी काही फोटो शेअर केले आहेत. ही महिला नवऱ्याच्या आळशी स्वभावाला कंटाळलेली आहे. तिच्यामते तिलाच घरगुती कामं करावी लागतात आणि पती तिला थोड्याफार प्रमाणात मदत करतो. पण, थोडीची मदत करूनही तो जास्त कामांचा दावा करतो.

जाहिरात
0307

ही महिला या फ्रेमवर दिवसाची, आठवड्याची आणि महिन्याची कामांची यादी तयार करायची. पत्नीने त्यातली काम केली तर गुलाबी रंगाचे टिक मार्क आणि पतीने एखादं काम केलं तर, ग्रीन कलरचा टिक मार्क करायचा असं तिने ठरवलं.

जाहिरात
0407

महिला संपताना या यादी वर 27 गुलाबी रंगाचे टिक मार्क होते आणि केवळ 8 हिरव्या रंगाचे टिक मार्क होते. त्यानंतर या महिलेने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आणि नवऱ्यापेक्षा जास्त काम करत असल्याचा दावा केला.

जाहिरात
0507

फेसबुकवर फोटो शेअर करताना तिने त्याला एक कॅप्शनही दिलं. यादी वाचता येणार नसली तरी, टिक मार्क दिसतील. यातली गुलाबी टिक मार्क माझ्या कामांचे आणि हिरवे पतीचे आहेत. असं तिने लिहीलं.

जाहिरात
0607

तिच्या पोस्टनंतर महिलांच्याही भरपूर कमेंट यायला लागल्या. बर्‍याचशा महिलांनी आपलं दुःख या ठिकाणी शेअर केलं आणि नवरा घरकामात मदत करत नसल्याचं सांगितलं.

जाहिरात
0707

एका महिलेने असा दावा केला की घरकामात मदत करणाऱ्या नवऱ्याला त्याबदल्यात तिला पैसे द्यावे लागतात. तर, एकजण म्हणाली की माझीही हिच परिस्थिती आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या