JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Period मध्ये शरीर जड झाल्यासारखं वाटतं; खरंच वजन वाढतं का?

Period मध्ये शरीर जड झाल्यासारखं वाटतं; खरंच वजन वाढतं का?

मासिक पाळीत (menstrual period) शरीर जड झाल्यामुळे आपलं वजन (weight) तर वाढलं नाही ना अशीच चिंता तुम्हालापण आहे का? तर असं का होतं जाणून घ्या.

0106

मासिक पाळीत शरीर जड झाल्यासारखं वाटतं. पोट फुगल्यासारखं आणि ब्रेस्टही वाढल्यासारखे वाटतात. यामुळे आपलं वजन तर वाढलं नाही ना, असाच प्रश्न कित्येक महिला आणि तरुणींच्या मनात निर्माण होतो.

जाहिरात
0206

मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळीच्या कालावधीत शरीराचं वजन वाढल्यासारखं वाटतं. मात्र मासिक पाळीचा कालावधी सुटल्यावर ही समस्या आपोआप दूर झाल्याचंही दिसतं.

जाहिरात
0306

फक्त मासिक पाळीत शरीर जड होणं म्हणजे खरंच वजन वाढतं का, का आणि असं असा प्रश्न तुम्हालाही प्रत्येक महिन्याला पडत असेल.

जाहिरात
0406

वुमेन हेल्थमध्ये दिलेल्या माहितीनुसार मासिक पाळीत वाढणारं वजन हे प्रत्यक्ष वाढलेलं फॅट नसतं. तर बहुतेक वेळा हे शरारीतील पाण्याचं वाढलेलं प्रमाण असतं.

जाहिरात
0506

मासिक पाळीदरम्यान सेक्स हार्मोन एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉनची पातळी बदलते. जेव्हा या हार्मोन्सची पातळी वाढते तेव्हा त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम शरीरातील पाणी टिकून राहण्याची क्षमता वाढते. त्यामुळे काही प्रमाणात वजन वाढतं.

जाहिरात
0606

मासिक पाळीत काहीतरी सॉल्टी किंवा स्वीट खाण्याचं मन करतं. असे पदार्थ खाल्ल्यानं वजनावर परिणाम होतो, शिवाय वारंवार तहान लागते आणि जास्त पाणी पिणं होतं, त्यामुळे अप्रत्यक्षरित्याही वजन वाढतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या