रुग्णालयामार्फत (Hospital) आवश्यक त्या नियमांचं पालन केलं जात असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
कोरोनाव्यतिरिक्त इतर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी धावाधाव करत आहे. काही खासगी हॉस्पिटल्समध्ये ओपीडीला सुरुवात झाली असून कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर, दुखण्यांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी.
इतर आजाराच्या रुग्णांनी किंवा इतर नागरिकांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे इंटरनल मेडिसीन एक्सपर्ट डॉ. तुषार राणे यांनी मार्गदर्शन केलं आहे.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर शरीराच्या तापमानाची तपासणी, सॅनिटायझिंग असे कोरोनासंबंधी मूल्यांकन पूर्ण करूनच रुग्णालयात प्रवेश करावा.
रुग्ण स्वत: रुग्णालयात जाण्यास सक्षम असतील तर शक्यतो त्यांनीच रुग्णालयात जावं. गरज असेल तरच सोबत एखाद्या व्यक्तीला न्यावं.