शरीरात पाण्याची पातळी कमी (Low water level) झाल्यामुळं अनेक समस्या उद्भवतात. अनेकांना कोणत्याही ऋतूमध्ये ही समस्या होत असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असा कोणताही ऋतू असो, शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अन्यथा, अनेक प्रकारच्या लहान-मोठ्या आजारांना आमंत्रण (water level and health) मिळतं.
पोट बिघडणं, पोटातून आवाज येणं, जुलाब, कडवट करपट ढेकर ही सर्व शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याची लक्षणं आहेत. अशा प्रकारची लक्षणं जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही समस्या छोटीशी वाटली तरी ती अंगावर काढू नये.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं - जास्त प्रमाणात भूक लागणं पिवळ्या रंगाची लघवी होणं
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात? - डोकेदुखी पोट साफ न होणं किंवा बद्धकोष्ठता
पाणी कमी पडल्यास हे त्रासही होऊ शकतात - त्वचा कोरडी पडणं किंवा त्वचेतील ओलावा कमी होणं रक्तदाब कमी होणं मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका
ही लक्षणं सामान्य वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यासाठी दररोज तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्ही थंडीमध्ये पाणी थंड असल्यामुळं ते योग्य प्रमाणात पिऊ शकत नसाल तर, पाणी थोडंसं कोमट करून प्यावं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)