कलिंगडात खूप पाणी असतं. आरोग्यासाठी हे फळं उत्तम आहे. जाणून घ्या त्याचे फायदे
उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी निसर्गानंच काही फळं या काळात दिलीयत. त्यातलंच एक कलिंगड. जे उन्हाळ्यात मिळतं. कलिंगडात खूप पाणी असतं. आरोग्यासाठी हे फळं उत्तम आहे.
हे अल्कली गुणधर्माचं फळ असल्याने, पित्ताच्या दोषांवर गुणकारी ठरते. उन्हाळ्यात घामातून शरीरातील खनिजे निघून जातात, पण कलिंगड खाल्ल्याने तहान भागते आणि शरीरातील खनिज द्रव्यांची हानी भरून निघते. सूर्यकिरणांच्या थेट माऱ्यामुळे होणारे रेडिएशनचे परिणाम कमी होतात.
इतर फळांच्या तुलनेत कलिंगडात पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगडाचं सेवन लाभदायक ठरतं.
कलिंगड 78% भाग हा गराचा असल्याने ते खाद्य आणि पेय दोन्ही आहे. उन्हाळ्यात कलिंगडाइतके उत्साहवर्धक पेय दुसरं नाही.