JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Vegetarian Protein Foods: मांसाहाराचीच कशाला हवीय गरज; या 7 Veg गोष्टी प्रोटीनची गरज करतील सहज पूर्ण

Vegetarian Protein Foods: मांसाहाराचीच कशाला हवीय गरज; या 7 Veg गोष्टी प्रोटीनची गरज करतील सहज पूर्ण

प्रथिने शरीरातील विविध पेशींची दुरुस्ती करून नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. याशिवाय प्रथिनांचे योग्य प्रमाण वजन कमी करण्यास आणि स्नायू बळकट करण्यास मदत करते. शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी आहारात जाणीवपूर्वक बदल करावे लागतात.

0107

पनीर पनीरला कॉटेज चीज असेही म्हणतात. ते दुधापासून बनवले जाते. 100 ग्रॅम पनीरमध्ये 18-20 ग्रॅम प्रोटीन असते. पनीर कोणत्याही स्वरूपात खाऊ शकतो. उदा: भुर्जी बनवणे, भाजी बनवणे, कच्ची इ.

जाहिरात
0207

शेंगदाणे हेल्दी फॅट आणि प्रथिने शेंगदाण्यात जास्त प्रमाणात आढळतात. 100 ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे 25 ग्रॅम प्रथिने आढळतात. शेंगदाणे चवीलाही छान लागतात आणि सहज उपलब्ध असतात. बाजारात उपलब्ध असलेले पॅकेज केलेले शेंगदाणे खाणे टाळा, कारण त्यांना दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह वापरले जातात.

जाहिरात
0307

डाळी डाळी हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे. डाळींमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. अर्धा कप पिवळ्या किंवा हिरव्या डाळींमध्ये सुमारे 8-9 ग्रॅम प्रथिने आढळतात. प्रोटीनसाठी तुम्ही मूग, तूर आणि हरभरा डाळ खाऊ शकता.

जाहिरात
0407

हरभरा शिजवलेले चणे किंवा छोले प्रथिनांनी समृद्ध असतात, अर्ध्या कप हरभऱ्यामध्ये सुमारे 7.25 ग्रॅम प्रथिने असतात. छोले रोटी किंवा भातासोबत खाता येतात, ज्याची चवही खूप स्वादिष्ट असते. हरभरा किंवा चणे ठराविक प्रमाणातच खा, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.

जाहिरात
0507

बदाम 28 ग्रॅम बदामामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने आणि 14 ग्रॅम निरोगी चरबी आढळते. यामध्ये कॅलरीज जास्त असतात पण त्यामुळे शरीराला खूप फायदा होतो.

जाहिरात
0607

चिया बिया चिया बियांमध्ये भरपूर पोषक असतात. 28 ग्रॅम चिया बियांमध्ये 4 ग्रॅम प्रथिने असतात. ते कोणत्याही स्वरूपात सेवन केले जाऊ शकतात. संशोधनानुसार, यामुळे रात्रीची भूक 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

जाहिरात
0707

मटार हिवाळ्यात येणारे हिरवे वाटाणे हे प्रथिनांचाही चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम वाटाण्याच्या दाण्यांमध्ये 5.4 ग्रॅम प्रथिने असतात. चवीसोबतच ते पौष्टिकतेमध्येही उत्तम आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या