JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तरुणी ते महिला, Vagina चा प्रवास; वयासोबत योनीमध्ये असे होतात बदल

तरुणी ते महिला, Vagina चा प्रवास; वयासोबत योनीमध्ये असे होतात बदल

जसजसं वय वाढतं, तसतसे व्हजायना (Vagina) मध्ये बदल होतात.

0106

तारुण्यात येणारे प्युबिक हेअर काढण्यासाठी महिला कित्येक रुपये खर्च करतात. मात्र जसजसं वय वाढत जातं, तसतसं प्युबिक हेअरमध्ये बदल होतात. 40 ते 50 या वयात एस्ट्रोजेनची कमी होते आणि त्यामुळे गुप्तांगावरील केस विरळ होत जातात. त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही.

जाहिरात
0206

वय जसजसं वाढतं तसतंस योनी आकुंचन पावते. यालादेखील एस्ट्रोजेनची पातळी कमी होणं हेच कारण आहे. व्हजायनाचं द्वार हळूहळू आकुंचित होतं. मात्र हे सर्व एक-दोन दिवसात होत नाही. तर याला 10 ते 20 वर्ष लागतात.

जाहिरात
0306

वय वाढल्यानंतर रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज येतंय यावेळी मासिक पाळी कायमची बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते. शरीरात एस्ट्रोजेनची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे व्हजायनची त्वचा पातळ होते किंवा सुकू लागते. याला सूज येण्याचीही शक्यता असते.

जाहिरात
0406

चाळीशीच्या वयात व्हजायनामध्ये कोरडेपणा येतो. योनीमधील चिकटपणा कमी झाल्याने शारीरिक संबंधांवेळी वेदना होऊ शकतात. शिवाय लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणं अशा समस्या उद्भवतात.

जाहिरात
0506

योनीमधील स्रावाच्या कमरतेमुळे PH ची पातळीही बदलते. अशावेळी व्हजायनामध्ये बॅक्टेरिया आणि यीस्टची वाढ होते. वाढत्या वयात व्हजायनामध्ये खाज येऊ लागते. व्हजायना इन्फेक्शन होतं.

जाहिरात
0606

सूचना – ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज लोकमत याची पुष्टी देत नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या