JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / संपूर्ण जगासाठी संकट पण तिच्यासाठी वरदान ठरला कोरोना; संपूर्ण आयुष्यच बदललं

संपूर्ण जगासाठी संकट पण तिच्यासाठी वरदान ठरला कोरोना; संपूर्ण आयुष्यच बदललं

गेली कित्येक वर्षे विचित्र आजाराशी ही महिला झुंज देते आहे, त्यामुळे तिला ज्या समस्यांचा सामना करावा लागत होता, त्यावर ती कोरोनामुळेच मात करू शकली.

0107

कोरोनाव्हायरस आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपूर्ण जगासमोरील एक मोठं संकट आहे. असं असताना हे संकट कुणासाठी वरदान ठरू शकतं, यावर विश्वासच बसणार नाही. मात्र यूकेतील एका महिलेच्या बाबतीत ते खरं झालं आहे. (फोटो सौजन्य -  bellehutt/इन्स्टाग्राम)

जाहिरात
0207

गेल्या 9 वर्षांपासून विचित्र आजारांशी झुंजणाऱ्या बेली हट्टसाठी कोरोना आणि लॉकडाऊन खऱ्या अर्थानं वरदानच ठरला असं म्हणावं लागेल. (फोटो सौजन्य -  bellehutt/इन्स्टाग्राम)

जाहिरात
0307

बेली हट्ट ही फिटनेस ट्रेनर आहे. तिला 2012 सालापासून नारकोलेप्सी हा आजार आहे. यामुळे तिला दिवसाला 16-16 तास झोप लागते. बेलीला तिच्या या आजारामुळे दैनंदिन कामंही करणं अशक्य होतं. शाळा, परीक्षा, कँटीन कुठेही ती झोपायची. (फोटो सौजन्य -  bellehutt/इन्स्टाग्राम)

जाहिरात
0407

डेली मेलीशी बोलताना तिनं सांगितलं, या आजारामुळे आपल्याला वयाच्या 16  व्या वर्षी  शाळा सोडावी लागली. तिला इंटरिअर डिझायनर व्हाययचं होतं, मात्र आपल्या या आजारामुळे हे शक्य नाही. तसंच आपण 9 ते 5 या वेळेत कामही करू शकत नाही. त्यामुळे खूप चिंतेत, तणावात होती. (फोटो सौजन्य -  bellehutt/इन्स्टाग्राम)

जाहिरात
0507

बेलीनं एकदिवस रनिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिच्यामध्ये झालेला बदल पाहून तिची आईदेखील हैराण झाली. कारण बेली खूप अॅक्टिव्ह दिसत होती. एक्सरसाइजमुळे आपण बरे होत आहोत, आपल्या आजाराशी लढा देण्यासाठी आपण सक्षम देत आहोत हे तिला समजलं. तेव्हा हेच आपलं करिअर म्हणून तिनं निवडलं. ती जीम ट्रेनर बनली. (फोटो सौजन्य -  bellehutt/इन्स्टाग्राम)

जाहिरात
0607

जिममध्येही तिला समस्या उद्भवायच्या, तिला स्लीप अटॅक यायचे. मात्र लॉकडाऊन लागू झाला आणि तो बेलीसाठी फायदेशीर ठरला. तिनं ऑनलाइन फिटनेस सेशन्स सुरू केले. ज्यामुळे ती आपल्या शेड्युलनुसार ऑनलाइन फिटनेस क्लास घेते, ज्यामुळे तिला पैसे मिळतात. शिवाय काही वेळाची पुरेशी झोपही घेता येते. (फोटो सौजन्य -  bellehutt/इन्स्टाग्राम)

जाहिरात
0707

एक्सरसाईझमुळे आपलं आयुष्य बदललं, आपल्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं तिनं सांगितलं. आपल्यासारखाच आजार असलेल्या इतरांनाही ती आता प्रोत्साहीत करते. (फोटो सौजन्य -  bellehutt/इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या