JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / नको ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरगुती उपायांनीच जातील चेहऱ्यावरचे डाग

नको ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरगुती उपायांनीच जातील चेहऱ्यावरचे डाग

किचन मधले काही पदार्थ त्वचेसाठी वरदान ठरतात. त्याचा वापर फेस पॅक म्हणून केल्यास सगळ्या समस्या संपतात.

019

चेहऱ्याच्या काही समस्या असतील तर, सारखं लक्ष तिकडेच जातं. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. चेहऱ्यावर आलेले डाग किंवा पिग्मीटेशनचे डाग लवकर जात नाहीत.

जाहिरात
029

त्यामुळे आपण कितीही ब्युटी प्रॉडक्ट लावले तरी, त्यांचा परिणाम चांगला होतोच असं नाही. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी अनेक होम रेमेडी केल्या असतील तरीदेखील हे सोपे उपाय करून पहा. यामुळे त्वचा तजेलदार दिसायला लागेल.

जाहिरात
039

आपल्या किचनमध्ये सहजपणे मिळणारा बटाटा हा त्वचेच्या समस्यांसाठी उत्तम उपाय ठरू शकतो. बटाट्याचा वापर करून पिंपल्स, टॅनिंग आणि सुरकुत्या कमी करता येतात.

जाहिरात
049

पिग्मीन्टेशन डार्क सर्कल आणि टॅनिंग झाले असेल तर बटाट्याचा वापर करून कमी करता येतं. बटाट्याच्या फेस पॅकमुळे चेहरा चमकदार होतो, बटाट्याचा कीस वापरून स्क्रबिंग करता येतं.

जाहिरात
059

दररोज बटाट्याच्या किसने स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्यावर दूध लावावं. या वापराने हळूहळू त्वचेवरचे डाग कमी होऊन स्किन चमकदार होईल.

जाहिरात
069

नारळाचं पाणी डार्क सर्कल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद मिसळा व्यवस्थित एकत्र करून आईस ट्रेमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा.

जाहिरात
079

दररोज 1 तुकडा आपल्या चेहऱ्यावर लावा 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामधील कॅरोटीनमुळे त्वचा सुंदर होईल.

जाहिरात
089

हळदीचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. हळद अत्यंत आरोग्यदायक आहे. शरीराबरोबरच त्वचेसाठी हळद उपयुक्त आहे. हळदीचा वापर करून चेहऱ्याच्या समस्या कमी करता येतात. 1 चिमूट हळद, 1 चमचा साय आणि पाव चमचा गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा.

जाहिरात
099

ही पेस्ट आपले हात आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित लावा. 20 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. त्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरचे डाग कमी होतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या