JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका

रक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका

आजही अनेकांना असे वाटते की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रक्तदानाचा जरा समोरच्या वक्तीला फायदा होतो तसाच फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती या इतरांपेक्षा जास्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात. पण रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली गेली नाही तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. रक्तदानाबद्दल अनेकांच्या मनात आजही अनेक शंका असतात. आज आम्ही तुमच्या याच शंकेचं निरसन करणार आहोत. रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय करावं याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

स्वस्थ पुरुष तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतो. तर स्वस्थ महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करु शकतात. महिला आणि पुरुषांच्या रक्तदान करण्यामध्ये फरक असण्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांच्या शरीराची जढण वेगळी आहे. मासिकपाळीमुळे महिलांच्या अंगातून महिन्यातून एकदा दुषित रक्त बाहेर पडत असतं. त्यामुळे त्यांनी शक्यतो चार महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.

आजही अनेकांना असे वाटते की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. पण मुळात असे काही नसते. रक्तदान केल्यानंतर 21 दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होतं. शरीरातील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर अनेक आजार होऊ शकतात. सतत थकणं, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, चक्कर येणं, डोकं दुखणं अशा आजाराने माणूस त्रस्त होतो.

एकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही. रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये. जर मद्यपान केले असेल तर रक्तदान करु नये. रक्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी भरपेट खाणं गरजेचं आहे. रक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा. शरीराला आवश्यक पदार्थ सातत्याने खालले नाही तर त्याचा परिणाम लगेच दिसू लागतो. तसेच रक्तदान केल्यानंतर पुढील 12 तासांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यायाम करु नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या