JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Save Money Tips: पैशांची बचत करण्याचे हे 4 फंडे सगळ्यांच्याच आहेत कामाचे; कोलमडणार नाही बजेट

Save Money Tips: पैशांची बचत करण्याचे हे 4 फंडे सगळ्यांच्याच आहेत कामाचे; कोलमडणार नाही बजेट

असं अनेकांच्या बाबतीत घडतं की, आपण कितीही प्रयत्न केले तरी महिनाअखेरीस आपलं बजेट बिघडतं. आपल्या मनाला काही गोष्टींचा मोह होतो आणि मग काही खर्च अचानक बाहेर पडतात. अशा परिस्थितीत, पैसे वाचवण्याच्या काही टिप्स आहेत, ज्यांचे पालन केल्यास तुम्ही बरेच पैसे वाचवू (Save money Tips) शकता.

0104

सब्सक्रिप्शन शेअर करा आपल्या सर्वांना आता OTT प्लॅटफॉर्मचे मूल्य माहीत आहे. आपल्याकडे कितीही अॅप्सचे सब्सक्रिप्शन असलं तरी आपल्याला माहीत आहे की, आपण दोनपेक्षा जास्त अॅप्स पाहू शकत नाही. आपल्याकडे इतका वेळच नसतो. पैसे वाचवण्यासाठी आपण पाहत असलेल्या प्लॅटफॉर्मची सब्सक्रिप्शन घ्यावं आणि दुसरा उपाय म्हणजे तुमच्या मित्रांसह सब्सक्रिप्शन शेअर करावी म्हणजे दोघांचेही पैसे वाचतात.

जाहिरात
0204

खाद्य पदार्थांचे बिल आपल्या सर्वांना कधी ना कधी बाहेरून जेवण मागवावं लागतं, पण जर तुम्ही आठवड्यातील दोन दिवस काही खास पदार्थ घरीच बनवायचे ठरवले तर तुम्हाला बाहेरचे काही खाण्याची फारशी इच्छा होणार नाही. तुमची लालसाही शांत राहील आणि तुमचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत. अनेकांच्या हे लक्षात येत नाही, मात्र बाहेर खाण्यामध्ये खूप पैसे खर्च होतात.

जाहिरात
0304

ऑनलाइन खरेदी ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, आपण खरेदी का करीत आहात हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे? अनेक लोक जेव्हा दुःखी, उदास असतात तेव्हा खरेदी करत सुटतात. परंतु, आपण आपल्या गरजेनुसार खरेदी करणं केव्हाही चांगलं आहे. तुम्ही खरेदीसाठी किमती खाली येण्याची प्रतिक्षादेखील करू शकता.

जाहिरात
0404

क्रेडिट कार्ड वापरू नका सामान्यतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुम्ही नंतर पैसे भरण्याच्या नावाखाली खूप खर्च करता, त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम वापरा, म्हणजे खर्च करताना हात आपोआप आखडता घेतला जातो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या