सेकंड होम घ्यायचा विचार असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
मुंबई, 22 ऑगस्ट : देशातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू केले गेले. याचा फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला. परिणामी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम दिसून आले. अनेकांना आपले रोजगार किंवा नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अनेक कर्मचाऱ्यांना पगार कपातीलाही सामोरे जावे लागलं. अर्थात या सगळ्या घडामोडींचा परिणाम रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रावरही झाला. घरांच्या खरेदी-विक्रीत घट झाल्याचे सध्या चित्र आहे. त्याचप्रमाणे बाजारातील मंदीचा परिणाम सेकंड होम खरेदीवर झाल्याचे दिसून येत असून, ही खरेदी काहीशी मंदावल्याचे चित्र आहे. परंतु, सध्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण स्थिती सेकंड होम (Second Home) खरेदी करु इच्छिणाऱ्यांची पथ्यावर पडताना दिसत आहे. सेकंड होम खरेदीचे स्वप्न सत्यात उतरवत असताना केलेल्या गुंतवणुकीतून नफा कसा मिळवावा, याचे एक वेगळे गणित असते. हे गणित यशस्वीपणे साध्य करण्यासाठी काय करावं, याबाबत आम्ही तुम्हाला काही मार्गदर्शनपर टिप्स देत आहोत. जर तुम्ही एखाद्या पर्यटनस्थळी (Tourist Point) सेकंड होम खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम त्याविषयी पुरेपुर माहिती घेणं, संशोधन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही अविचाराने एखादे सेकंड होम खरेदी केले आणि तुमच्या गरजा या घराच्या माध्यमातून पूर्ण होणार नसतील, तर तुमचा निर्णय हा न परवडणारा ठरु शकतो. त्यामुळे सेकंड होम खरेदी करताना, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करुन निर्णय घेणं आवश्यक आहे. एखाद्या पर्यटन स्थळी दरवर्षी तुम्ही सुट्टीच्या कालावधीत येता, त्यामुळे त्या परिसराशी तुम्ही काही अंशी समरस झालेला असता. परंतु, त्या ठिकाणी घर खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एक पर्यटक म्हणून असा निर्णय न घेता, त्या क्षेत्राची, परिसराची बारकाईने माहिती घेऊन, स्थानिकांशी संवाद साधून तसेच त्या ठिकाणी ऑफसीझन (Off Season) येत पाहाणी करुन निर्णय घ्यावा. जर तुम्हाला महिन्याचे हप्ते तुमच्या उत्पन्नातून द्यायचे नसतील, तर सेकंड होम खरेदी करुन ते आपल्याला भाडेतत्वावर (Rent) देता येईल का याचा परिस्थितीनुरूप विचार करा. कारण हे सेकंड होम भाडेतत्वावर देत तुम्ही अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय तयार करु शकता. जमीनदार असणं हे खूप जबाबदारीचं असतं. त्यामुळे सेकंड होम खरेदी करुन ते भाडेतत्वावर देण्यापूर्वी भाडेकरु कायदे, फेअर हाऊसिंग अॅक्ट सारख्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करा. तुमच्या जीवनशैलीनुसार तुम्हाला सेकंड होम खरंच गरजेचे आहे का याचाही क्षणभर विचार करा. जर तुम्ही वीकेंड दरम्यान राहण्यासाठी सेकंड होम खरेदी करु इच्छित असाल, तर तुम्हाला पहिल्या घराच्या तुलनेत एक चांगला पर्याय ठरु शकतो. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक (Investment) शक्य असेल आणि निवृत्तीचा काळ सेकंड होममध्ये व्यतीत करायचा असेल तर त्यादृष्टीने घरातील, परिसरातील सुविधा आणि आरोग्य सुविधेविषयी सविस्तर माहिती घ्या. शहरापासून दूर आणि अपरिचित ठिकाणी घर खरेदी करणं जोखमीचं ठरू शकतं. अशा वेळी स्थानिक बाबींची सखोल माहिती असलेला इस्टेट एजंट तुम्हाला मदत करु शकतो. त्यामुळे सेकंड होमचा विचार करताना असा इस्टेट एजंट (Estate Agent) हायर (Hire) करणं सोयीस्कर ठरू शकतं. कॉन्डो किंवा सिंगल फॅमिली होम खरेदीबाबत निर्णय घेताना त्याच्या देखभालीसाठी तुम्ही किती वेळ देऊ शकता याचाही आढावा घेणं आवश्यक आहे. खरेदीदारांसाठी कोंडो हा चांगला पर्याय ठरू शकतो कारण यात गरजेनुसार कधीतरी घरांचा वापर करता येतो आणि वर्षभर मेंटेनन्स करण्याची गरज राहत नाही. परंतु, तुम्हाला जर तुमची प्रायव्हसी कायम हवी असेल तर सिंगल फॅमिली होम खरेदी करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. बाजार सतत बदलत असतो. पहिल्या घरावेळी तुम्हाला लेंडरने (Lander) सांगितलेल्या अटींच्या मोहात परत पडू नका. अधिक चांगली डिल मिळवण्यासाठी जे आवश्यक आहे ते प्राधान्याने करा. जर तुम्ही स्वतःहून सेकंड होम खरेदी केले तर त्यासाठी तुम्हाला खूप खर्च येऊ शकतो. अशावेळी मित्र- नातेवाईकांचा आर्थिक सहभाग घेत सेकंड होम खरेदी केले किंवा बांधले तर तुम्ही त्यांच्यासोबत या घरात सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. सेकंड होमच्या खर्चाचा विचार करताना विमा आणि मेंटेनन्स खर्च हे कदापि विसरु नका. कारण काही पर्यटनस्थळी चक्रीवादळ, पूर किंवा वणव्यांचा धोका असतो. अशा वेळी घराचा विमा असणं फायदेशीर ठरतं. यासाठी विमा (Insurance) योजनांची घर खरेदीपूर्वी माहिती घ्या. घराच्या मेंटनेन्सचा विचार करता घराच्या किमतीच्या 2 टक्के रक्कम दरवर्षी घराच्या देखभाल दुरुस्तीसाठी वेगळी ठेवा. तुम्ही तुमचे घर वर्षातील केवळ 15 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी भाड्याने दिले तर तुम्हाला भाडेपट्टीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. परंतु, तुम्ही करामध्ये देखभाल खर्चही दाखवू शकत नाही. जर तुम्ही वर्षातील 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस घर भाडेतत्वावर दिले तर तुम्हाला उत्पन्नाचा तपशील द्यावा लागतो. परंतु, तुम्ही देखभाल आणि साफसफाईसारखे खर्च त्यात दाखवू शकता. सेकंड होम खरेदी करण्यापूर्वी वरील बाबी ध्यानात घेऊन योग्य नियोजन केले तर तुम्हाला सेकंड होम निश्चितच फायदेशीर ठरु शकते आणि त्यामाध्यमातून उत्पन्नाचा नवा स्त्रोतही उपलब्ध होऊ शकतो.