JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Teachers Day : सर्वपल्ली राधाकृष्णन ते डॉ. अब्दुल कलाम; शिक्षकांबाबत त्यांचे अनमोल विचार

Teachers Day : सर्वपल्ली राधाकृष्णन ते डॉ. अब्दुल कलाम; शिक्षकांबाबत त्यांचे अनमोल विचार

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Sarvepalli Radhakrishnan) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी शिक्षक दिन (teachers day) म्हणून साजरा केला जातो.

0106

सर्वपल्ली राधाकृष्णन - ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

जाहिरात
0206

स्वामी विवेकानंद - उत्तम माणूस घडवणं हे शिक्षणाचं ध्येय असावं. मुलांची वैचारिक, शारिरीक आणि अध्यात्मिक प्रगती करण्याचं कौशल्य शिक्षक विकसित करू शकतात.

जाहिरात
0306

महात्मा गांधी - मुलांना मुक्तपणे विचार करायला कोण शिकवू शकतो असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे शिक्षक. सर्व बाजूंचे विचार आत्मसात करून स्वत:चा नवा विचार करायला शिकवणं हे शिक्षकाचं काम आहे.

जाहिरात
0406

साने गुरूजी - मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो.

जाहिरात
0506

साने गुरूजी - मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो.

जाहिरात
0606

डॉ. रघुनाथ माशेलकर - विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता एकत्र करून त्याला दिशा देण्याचं काम शिक्षक करतो. असे आदर्श शिक्षक मिळाल्यानेच माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. माझं आयुष्यबदलून गेलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या