JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / ही वाईट सवय तुम्हालाही नाही ना? चुकूनही पिऊ नका या वेळी चहा

ही वाईट सवय तुम्हालाही नाही ना? चुकूनही पिऊ नका या वेळी चहा

कधीकधी काही पदार्थ खात असताना त्यासोबत चहा प्यायला आपल्या आवडतं पण, चहाप्रेमींनो एकदा आधी हे वाचा…

019

आपल्या सगळ्यांना थकवा घालवण्यासाठी प्यावसं वाटणारं प्येय्य म्हणजे चहा, चहा प्यायल्याने तरतरी येते. काहीजण तर, चहाशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांच्या दिवसाची सुरवातच चहाने होते. तर, संध्याकाळी थकवा जाण्यासाठी चहा घेतल जातो.

जाहिरात
029

चहा हे सगळ्यांचं आवडीचे प्येय आहे. कधी कधी काही पदार्थ खात असताना त्यासोबत चहा प्यायला आपल्या आवडतं मात्र, काही खाल्ल्यानंतर त्यावर चहा पिणं आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतं.

जाहिरात
039

न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्सपर्ट वरुण कत्याल ( Varun Katyal, Nutritionist And Wellness Expert) यांच्यामते जेवल्यानंतर लगेच चहा घेण्याची पद्धत अतिशय वाईट (Bad Habit) आहे.

जाहिरात
049

त्यामुळे शरीरात पोषक घटकांचे शोषण होत नाही. यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो शिवाय आयर्न आणि प्रोटीन शरीरामध्ये पचत नाहीत.

जाहिरात
059

जेवणानंतर चहा प्यायची सवय असेल तर ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. चहामध्ये कॅफीन असल्यामुळे मुळे ब्लडप्रेशर वाढू शकतं याशिवाय हायपर टेन्शन, हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी चहा मुळीच पिऊ नये. यामुळे हृदयावर परिणाम होतो हृदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात.

जाहिरात
069

काही खाल्ल्यानंतर चहा प्यायची सवय असेल तर, आधीच बंद करा यामुळे खाल्लेलं अन्न पचत नाही आणि मग पोटामध्ये ऍसिड वाढायला लागतं. त्यामुळे अपचन ऍसिडिटी सारखे त्रास होऊ शकतात.

जाहिरात
079

जेवल्यानंतर चहा प्यायची सवय असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते.

जाहिरात
089

आयर्न कमी झालं की, रक्तही कमी व्हायला लागतं. चहामध्ये फेनोलिक ऍसिड असतं यामुळे आयर्न शोषलं जात नाही.

जाहिरात
099

डोकं दुखत असेल तर बरेच जण चहा पितात मात्र, जेवणानंतर चहा पिण्यामुळे शरीरामध्ये ऍसिड वाढून डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेवल्यानंतर एक ते दोन तासांनी चहा प्यावा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या