औषधं घेऊनही बरा न होणारा आजार म्हणजे संधीवात (Rheumatoid Arthritis). हा साध्यांशी संबंधीत आजार वयाच्या 30 ते 50 या काळात होऊ शकतो.
ह्युमेटॉइड आर्थरायटिस महिला आणि पुरुष दोघांनाही होणार आजार असला, तरी महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. महिलांमध्ये असलेल्या फिमेल हार्मोन्समुळे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे.
ह्युमेटॉइड आर्थरायटिस हा सुज येण्यासंबंधीचा आजार आहे. हा एक ऑटोइम्युन आजार आहे ज्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील स्वस्थ पेशींनाच नुकसान पोहचवायल सुरुवात करते. या आजारात सांध्यांबरोबर संपूर्ण शरीर, त्वचा, डोळे, फुप्फुसं, दृदय आणि पेशींवर प्रभाव पडतो.
ह्युमेटॉइड आर्थरायटिसमध्ये हाडांची झीज व्हायला लागते आणि त्यामुळे सांध्यांचा आकार बदलायला लगतो. त्यामुळे हातपायाची बोटं वळायला लागतात. सांधेदुखी, वेदना आणि जळजळ असा त्रासही सुरु होतो.
एकाहुन अधिक सांधे आणि मसल्स मध्ये वेदना व्हायला सुरुवात होते. साध्यांमध्ये ताठरता, बाक आणि सुज येते. चालताना त्रास होतो. थकवा जाणवतो.
कधीकधी बोटांवर गाठ तयार होऊन सुज येतं. वजन कमी व्हायला लागतं, तापही येतो. ह्युमेटॉइड आर्थरायटिस झालेल्या लोकांना सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगणं कठीण होतं.
ह्युमेटॉइड आर्थरायटिस आजाराची लक्षणं दिसत असतील तर, त्वरीत डॉक्टकरांशी संपर्क साधा. लक्षण सुरु झाल्यावर पहिल्या सहा महिन्यात निदान झाल्यास त्रास कमी करता येतो.
ह्युमेटॉइड आर्थरायटिस मध्ये नियमीत व्यायाम करण्याने फरक पडतो. व्यायामाबरोबर रोज जॉगिंग, सायकलिंग, स्विमींग देखील करु शकता. व्यायामामुळे स्नायुंमध्ये लवचिकता येते.
जास्त वजन असलेल्या लोकांना ह्युमेटॉइड आर्थरायटिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवावं. ह्युमेटॉइड आर्थरायटिस झालेल्या लोकांनी वजन कमी करण्याकडे लक्ष द्यावं. त्यासाठी आहाराकडे लक्ष द्यावं.
हा आजार मानसिक स्वास्थ्याशीही निगडीत आहे. तणाव आणि चिंता यामुळे या आजाराची जास्त लक्षणं जाणवतात. त्यामुळे मन शांतच ठेवण्यासाठी प्रयत्न करा. चांगली पुस्तक वाचा. चांगले विचार मनात आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या आजाराची लक्षण कमी होतील.