अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) अटक केल्यानंतर आता या अभिनेत्री NCB च्या रडारवर आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. आता अभिनेत्री दीपिका पादुकोण निशाण्यावर आहे. दीपिकाला चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आला आहे.
एनसीबीच्या तपासादरम्यान D N S K अशी नावं समोर आली आहे. त्यामुळे आता एनसीबी त्या दिशेनं आपला तपास सुरू आहे. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे.
सारा अली खानचं नावही समोर आलं. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केलं होतं. रियाने आपल्या जबाबात सांगितलं की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.एनसीबीने आता साराला 24 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे.
ड्रग पेडलर्सच्या चौकशीतच अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या नावाचाही खुलासा झाला. S म्हणजे श्रद्धा कपूरनेदेखील सुशांतसह फिल्ममध्ये काम केलं आहे. श्रद्धालाही 24 सप्टेंबरला चौकशीसाठी येण्यास सांगितलं आहे.
रियाने ज्या नावांचा खुलासा केला आहे, त्यामध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यासह फॅशन डिझायनर सिमोन खंबाटादेखील आहे. तिलाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं आहे.