अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या (sushant sing rajput suicide) केली. तो डिप्रेशनमध्ये (depression) असल्याची माहिती मिळते आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, तो डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे आढळून आली आहेत. डिप्रेशनची अनेक कारणं आहेत. यावेळी कित्येक जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात.
तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो. तुम्ही दु:खी आहात याची जाणीवही तुम्हाला होत नाही. तेव्हा समजा तुम्हाला डिप्रेशन आहे.
डिप्रेशन असल्यास कोणत्याच कामात मन लागत नाही, लक्ष केंद्रीत होत नाही, एकाग्रता कमी होते आणि निर्णय घेणंही अवघड जातं.