वर्किंग कपल्ससाठी एकत्र कुटुंबात (Joint Family) राहणं वरदान आहे. मुलांवर चांगले संस्कार होतात, अडचणीच्या काळात आधार मिळतो.
आता विभक्त कुटुंब पद्धती वाढलेली आहे. पण, खरंतर, मुंलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर, एकत्र कुटुंबात राहण्याला महत्व द्यावं. कारण न्यूक्लिअर फॅमिलीपेक्षा म्हणजेच विभक्त कुटुंब पद्धतीपेक्षा एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे जास्त आहेत.
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांना चुलत भावंडं, काका-काकी, आजोबा-आजी यांच्याबरोबर राहण्याची आणि त्यांचा प्रेम मिळवण्याची संधी मिळते. यामुळे मुलांना मोठ्यांचं संस्कार मिळतात. त्यांच्यावर सर्वांचा आदर करण्याचे संस्कार होतात.
बरचश्या गोष्टी पालकांना आपल्या मुलांना शिकवायच्या असतात मात्र, त्यांच्या धावपळीच्या आयुष्यामुळे त्यांना या गोष्टी मुलांना शिकवता येत नाहीत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलं आपोआपच एकमेकांना सांभाळून घेणं, प्रेम करणं, भावना व्यक्त करणं या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे मुलांचं कुटुंबाप्रती प्रेम वाढत राहतं.
नोकरी करणाऱ्या पालकांसाठी एकत्र कुटुंब पद्धती वरदानाप्रमाणे आहे. पालक नोकरीनिमित्त घराबाहेर पडले तरी मुलांना पाळणाघरात ठेवायची गरज पडत नाही.
त्यांचे काका-काकी आणि आजी-आजोबा त्यांचा सांभाळ करतात. त्यामुळेच घराबाहेर निश्चिंतपणे काम करता येतं आणि स्वतःला वेळही देता येतो.
एकत्र कुटुंब हे मोठं कुटुंब असतं. त्यामुळे यात कुटुंबाचे सदस्य जास्त असले तरीही कामं करताना याचा फायदा होतो.
जेवण बनवणं, घरातली काम, मुलांचा सांभाळ, अभ्यास या सगळ्यामध्ये कुटुंबातल्या सदस्यांची मदत मिळत असते. त्यामुळेच एका व्यक्तीवर त्याचा भार पडत नाही.
जॉईन्ट फॅमिलीमध्ये घरखर्चासाठी पैसे एकत्र केले जातात. दर महिन्याला कुटुंबातले कमावते सदस्य कुटुंब प्रमुखाला घर खर्चासाठी पैसे देतात. त्यामुळे घरांमधल्या खर्चाचा भार एकाच व्यक्तीवर पडत नाही.
त्यामुळे सेव्हिंग करता येतात किंवा एखाद्या सदस्याचं आर्थिक नुकसान झालं किंवा नोकरी गेली तरी टेन्शन येत नाही. कारण कुटुंबातले सदस्य त्यांच्या गरजांची काळजी घेतात.