JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / मंगळावर पोहोचलेल्या NASA Rover ने पाठवलेली अद्भुत छायाचित्रं

मंगळावर पोहोचलेल्या NASA Rover ने पाठवलेली अद्भुत छायाचित्रं

असा दिसतो जवळून मंगळ : NASA ने पर्सिव्हरेन्स रोव्हर (Mars 2020 Perseverance Rover) नावाचं यान मंगळावर पाठवलं आहे. त्यातून आलेली या तांबूस ग्रहाची विहंगम दृश्य

0107

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने नुकताच, मंगळ ग्रहावर परीक्षणासाठी perseverance rover नावाचं यान पाठवलं होतं. मंगळ ग्रहावर पोहोचल्यानंतर त्या यानाने काही फोटो पाठवले आहेत. (फोटो: Twitter NASA)

जाहिरात
0207

20 फेब्रुवारीला नासाच्या या रोव्हरने नेविगेशन कॅमेरा वापरून मंगळाच्या भूगर्भाचं परीक्षण करणारे फोटो काढले.

जाहिरात
0307

पर्सिव्हरन्स रोव्हर जेव्हा मंगळ ग्रहावर उतरलं, त्या क्षणी हे छायाचित्र टिपण्यात आलं आहे. (फोटो: Twitter NASA)

जाहिरात
0407

'हजार्ड' या कॅमेराद्वारे नासाने आज पर्यंतच सर्वात 'हाय रेजोल्युशन' असं छायाचित्र टिपलं आहे. हा कॅमेरा रोव्हरच्या खाली लावण्यात आला आहे. त्याचबरोबर रोव्हर वर अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ज्या माध्यामातून मंगळ ग्रहावरची विविध छायाचित्र टिपण्यात येणार आहेत.तसेच या छायाचित्रात मंगळावरील 'जजीरो क्रेटर' स्पष्टपणे दिसत आहे. हे छायाचित्र 18 फेब्रुवारीलाच घेण्यात आलं होत, मात्र नासाने ते 23 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलं आहे.

जाहिरात
0507

पर्सिवियरेंस रोव्हर मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर टिपण्यात आलेलं हे पहिलं छायाचित्र आहे.MROच्या हायराइज कॅमेराच्या माध्यमातून ते घेतलेलं आहे.हे छायाचित्र 19 फेब्रुवारीला घेण्यात आलं होत. या छायाचित्रातून ग्रहावरील विविध गोष्टी दिसून येत आहेत.

जाहिरात
0607

पर्सिवियरेंस रोव्हर मध्ये 'मास्टकॅम झेड'नावाची एक विशिष्ट कॅमेऱ्याची जोडी आहे. संशोधक कॅमेराच्या रंगचा आणि विविध सेटिंगचा मार्कर सारखा वापर करणार आहेत.'मास्टकेम 'कॅलिफोर्निया च्या सेन डीयागो मधील मालीन स्पेस सायन्स सिस्टमने तयार केलं आहे.

जाहिरात
0707

'मास्टकॅम ' च्या माध्यमातून अशी विविध छायाचित्रे टिपून पृथ्वीवर पाठवण्यात येत आहेत.दक्षिण कॅलिफोर्नियाच्या 'जेट प्रपलशन' या प्रयोगशाळेत ते तयार करण्यात आलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या