30 मे : निसर्गात घडणाऱ्या काही गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करतात. आणि निसर्गातील अशीच एक अचंबित करणारी गोष्ट पुन्हा एकदा समोर आलीय. युट्यूबवर एका व्यक्तीने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये एका सापाने दुसऱ्या एका जिवंत सापाला गिळल्याचं दिसतंय. परंतु तरीदेखील तो गिळला गेलेला साप जिवंत राहिलाय. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या क्रिस्तोपर रेनॉल्डने म्हटलंय की, ‘मी रेकॉर्ड केलला हा व्हिडिओ त्रासदायक आणि काहीसा विचित्रही आहे.आम्हाला तिथे पहाताच ज्या काळ्या सापाने दुसऱ्या सापाला गिळलं होतं त्याला काहीसं अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळेच त्याने त्या गिळलेल्या सापाला पुन्हा बाहेर काढलं.’ एकणूच हा व्हिडिओ पाहताना सुरवातीला अंगाचा थरकाप उडतो, परंतु नंतर मात्र दुसऱ्या सापाचा जीव वाचल्याने दिलासाही मिळतो.
(courtesy by Christopher Reynolds)