पाठीवर येणाऱ्या मुरुमांचा(Acne)त्रास असेल तर, काही घरगुती उपाय (Home Remedies) करता येतात.
पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही मोठ्या प्रमाणात चेहऱ्याबरोबर पाठीवरही मुरुम येण्याचा त्रास होतो. पाठीवर मुरुम असताना कपडे घातल्यावर खाज सुटत राहते किंवा रॅशेस येतात.
स्त्रियांना पुरुषांपेक्षा मुरूमांचा त्रास थोडा जास्त असतो. त्यामुळे महिलांना इच्छा असूनही डीप नेक किंवा बॅकलेस ड्रेस घालता येत नाही.
तेलकट त्वचा हे पाठीवर मुरुम येण्याचं एक कारण असू शकतं. स्किन पोर्सवर ऑईल जमा झाल्याने तिथे बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. ज्यामुळे पाठीवर मुरुम येतात.
अति घाम हे देखील मुरुमांचं एक कारण आहे. घामामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होण्यास सुरवात होते ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात.
कॉस्मेटीक्सचा अतिरीक्त वापर हे मुरुम येण्याचं कारण असू शकतं. कॉस्मेटीक्स जास्त वेळा वापरण्याने मुरुम होतात. शिवाय ऑईल मसाज किंवा वॅक्स करण्यानेही त्रास होतो.
बर्याच वेळा तरूणांना हार्मोन्सच्या बदलांमुळे पाठीवरच्या मुरुमांचा त्रास होऊ शकतो. शरीरात कधीकधी एंड्रोजन हार्मोन्सची पातळी वाढल्यामुळेही मुरुम येतात.
असंतुलित आहार देखील मुरुम होण्याचं कारण आहे. जास्त तेलकट, जंक फूड आणि फास्ट फूड खाल्ल्याने पाठीवर मुरुम येऊ लागतात.
अनुवांशिक हे देखील एक कारण आहे. जर कुटुंबातील एखाद्याला पाठीच्या मुरुमांचा त्रास असेल तर, घरातील इतर सदस्यांमध्येही तो त्रास दिसतो.
हळद, गुलाब पाणी, टी ट्री ऑईल, नारळाचं तेल, ऍलोवेरा जेल, कडुलिंबाची पानं,ग्रीन टी यांचा वापर करून पिंपल्स कमी करता येतात.