JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / किडनी फेल झाल्याने अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचा मृत्यू; काय आहेत या आजाराची कारणं, लक्षणं

किडनी फेल झाल्याने अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचा मृत्यू; काय आहेत या आजाराची कारणं, लक्षणं

किडनी फेल (Kidney Failure) झाल्याने ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) याचं शनिवारी निधन झालं.

0107

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) याचं शनिवारी निधन झालं.

जाहिरात
0207

आदित्य पौडवालची किडनी फेल झाली होती. अवघ्या 35व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.

जाहिरात
0307

शरीरातील रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.  जेव्हा किडनी आपलं हे कार्य करण्यास सक्षम राहत नाही, तेव्हा त्याला किडनी फेलर असं म्हणतात.

जाहिरात
0407

हेल्थलाइन या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार लघवी कमी होणं, पायाला सूज, श्वास घेताना त्रास, थकवा, मळमळ, छातीत वेदना किंवा दाब वाढल्यासारखं वाटणं ही किडनी फेल होण्याची काही प्रमुख लक्षणं आहेत.

जाहिरात
0507

किडनीला रक्तपुरवठा कमी होणं, हे किडनी फेल होण्याचं एक कारण आहे. हृदयाचे आजार, लिव्हर फेल हे त्यासाठी कारणीभूत ठरतं. शिवाय डिहायड्रेशन, गंभीररित्या भाजणं, अॅलर्जिक रिअॅक्शन, सेप्सिससारखं गंभीर इन्फेक्शनदेखील याचं एक कारण आहे.  उच्च रक्तदाब किंवा अँटि इन्फ्लेमेटरी औषधांमुळेही रक्तपुरवठा मर्यादित होतो.

जाहिरात
0607

जेव्हा लघवी योग्य प्रमाणात होत नाही तेव्हा विषारी घटक वाढू लागतात आणि किडनीवर ताण पजतो. प्रोस्टेट, कोलोना, सर्व्हिक, ब्लॅडर असे काही कॅन्सर यासाठी कारणीभूत ठरतात. तसंच किडनी स्टोन, मूत्रमार्गात रक्ताच्या गुठळ्या, लघवीवर नियंत्रण ठेवणाऱ्या नर्व्हला हानी पोहोचणं यामुळे लघवी नीट होत नाही.

जाहिरात
0707

याशिवाय मेटलशी जास्त संपर्कात आल्याने शरीरातील विषारी घटक वाढणं, ड्रग्ज, अल्कोहोल यासारख्या सवयीदेखील किडनी फेल होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या