रशियाने आपल्या Sputnik V कोरोना लशीची माहिती भारताला दिली आहे.
रशियाने जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आणि Sputnik V लस बाजारात आणण्याासाठी प्रयत्नही सुरू झाले. दरम्यान आता या लशीचं भारताही ट्रायल सुरू होणार आहे.
रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रिव यांनी 5 देशांची नावं जाहीर केली आहेत, जिथं रशियन कोरोना लशीची चाचणी सुरू होणार आहे.
भारत, सौदी अरब, यूएई, ब्राझील आणि फिलिपाइन्समध्ये रशियन लस स्पुनिक V चं क्लिनिकल ट्रायल होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलच्या परिणामाचा प्राथमिक अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.
येत्या आठवडाभरात Sputnik-V ही लस सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती रशियाने दिली आहे.