JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / रोज-रोज गव्हाची चपाती खाऊन कंटाळा आलाय? थंडीच्या दिवसात ट्राय करा या 5 प्रकारच्या भाकरी/थालीपीठ

रोज-रोज गव्हाची चपाती खाऊन कंटाळा आलाय? थंडीच्या दिवसात ट्राय करा या 5 प्रकारच्या भाकरी/थालीपीठ

Winter Diet: भाकरी हा भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक घरा-घरात भाकरी बनवली जाते. चुलीवर भाकरी केली की त्याची चव अनेक पटींनी वाढते. हिवाळ्यात कधी-कधी असं होतं की गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती खावीशी वाटत नाही आणि तुम्ही त्याला पर्याय शोधू लागता. यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण गव्हाच्या चपाती/पोळी व्यतिरिक्त इतर 5 प्रकारच्या पिठाच्या भाकऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचा तुम्ही तुमच्या रोजच्या मेनूमध्ये समावेश करू शकता. ते तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

0105

हिवाळा येताच मक्याची रोटी खायला पहिली पसंती मिळते. मक्याची रोटी चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मक्यामध्ये कर्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिड, कॅरोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात असते. जे अनेक आजारांशी लढण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

जाहिरात
0205

ज्वारीचे पीठ ग्लुटेनमुक्त असते आणि ज्वारीची गरमा-गरम भाकरी हिवाळ्यात खूप छान लागते. ती जर तूप लावून खाल्ली तर आणखी मजा येते. ज्वारीमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील आढळते, ज्याचा हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयोग आहे, तसेच ज्वारी वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हिवाळ्यात ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शरीराचे तापमान योग्य राहते.

जाहिरात
0305

बाजरी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजरी हा स्टार्चचा प्रमुख स्त्रोत आहे आणि ते ग्लूटेनमुक्त आहे. एकदा बाजरीची भाकरी खाल्ली की, लवकर भूक लागत नाही आणि यामुळे आपल्याला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. याशिवाय बाजरीमध्ये लोह, कॅल्शियम असे अनेक घटक असतात. हिवाळ्यात बाजरीची रोटी गुळासोबत खाण्याची मजा वेगळीच असते.

जाहिरात
0405

कुट्टूचे पीठ हिवाळ्याच्या काळात विशेषत: उपवासात वापरले जाते. यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्ससोबतच व्हिटॅमिन बी2 आणि अनेक खनिजे आढळतात. कुट्टूची रोटी खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले राहते तसेच रक्तदाबाशी संबंधित समस्या दूर राहतात. यामध्ये असलेले फायबर आणि मॅग्नेशियम चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. ते खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते..

जाहिरात
0505

हिवाळ्याच्या दिवसात नाचणी शरीराला उबदार ठेवते. नाचणीच्या भाकरीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत राहते. त्यामुळे हिवाळ्यात रोज किमान एका नाचणी रोटीचा आहारात समावेश करावा. त्यात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. हिवाळ्यात लसणाच्या चटणीसोबत नाचणीची रोटी खूप चवदार लागते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या