JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / गुलाबपाणी वापरण्याची योग्य पद्धत; त्वचेच्या सर्व समस्यांवर ठरेल उपयुक्त

गुलाबपाणी वापरण्याची योग्य पद्धत; त्वचेच्या सर्व समस्यांवर ठरेल उपयुक्त

गुलाबपाण्याचा (rose water) वापर करून तुम्ही घरच्या घरी वेगवेगळे फेस पॅक तयार करू शकता.

0107

पिंपल्स, निस्तेज त्वचा, सनबर्न, ऑईली स्किन अशा समस्यांवर गुलाबपाणी फायदेशीर आहे. मात्र त्याचा वापर नेमका कसा करावा जाणून घेऊयात.

जाहिरात
0207

चंदन पावडर आणि गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन एकत्र ठेवा. 25 मिनिटं चेहऱ्यावर लावा. चंदन पावडर नसेल तर तुम्ही मुल्तानी मातीही वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि पिंपल्स येण्याची समस्या कमी होते.

जाहिरात
0307

एक चमचा बेसन आणि 2 चमचे गुलाबजल एकत्र करून हा फेस लावा. या फेस पॅकमुळे त्वचेचा टाइटनेसपणा टिकून राहण्यास मदत होईल. त्वचा सैल पडणार नाही.

जाहिरात
0407

मध आणि रोझ वॉटर एकत्रितरित्या लावल्याने चेहऱ्यावर येतो. चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग, टॅनही कमी होतं. हा फेस पॅक काही मिनिटं चेहऱ्यावर लावून कोमट पाण्याने धुवा. 

जाहिरात
0507

लिंबाचा रस गुलाबपाण्यात मिसळून 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. यामुळे पिंपल्सची समस्या कमी होण्यास मदत होईल. 

जाहिरात
0607

अॅपल सिडेर व्हिनेगर आणि गुलाबपाणी हे एक चांगलं टोनरचं काम करतं. हे टोनर लावल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावा. 

जाहिरात
0707

सूचना - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या