पुरूषांना स्त्रीचं दिसणं (Looks) आवडतं तर, स्त्रीयांना पुरूषामध्ये…
रिलेशनशिपमध्ये महिला आणि पुरुषांच्या मताला समान महत्व असलं तरच, ते रिलेशन टिकतं. पार्टनर निवडताना महिला आणि पुरुष यांच्या प्राथमिकता वेगवेगळ्या असतात आणि वयानुसार त्या बदलत राहतात.
महिला आणि पुरुषांच्या वागणूकीवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड युनिवर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे.
या संशोधनानुसार महिला पुरषांकडे भावनिक आकर्षणाने पाहतात. त्याउलट पुरुष महिलांकडे शारीरिकरित्या आकर्षिले जातात. यासंदर्भात याआधीही काही संशोधन झालेलं आहे. संशोधक डॉक्टर स्टीफन व्हाइट यांच्या मते वयानुसार पुरुष आणि महिलांच्या गरजा बदलायला लागतात.
रिलेशनशिपमध्ये महिला आणि पुरुषांच्या मताला समान महत्व असलं तरच, ते रिलेशन टिकतं. पार्टनर निवडताना महिला आणि पुरुष यांच्या प्राथमिकता वेगवेगळ्या असतात आणि वयानुसार त्या बदलत राहतात.
डॉ.स्टीफन यांच्यामते 18 ते 40 या वयात फर्टिलीटी पीकवर असताना महिला आणि पुरुष त्यांच्या अपीयरेंसकडे आकर्षीले जातात तर, वय वाढल्यानंतर पर्सन्यालिटी आणि व्यवरहार या गोष्टींना अधिक महत्व दिलं जातं.
20 ते 30 वया दरम्यानचे लोक दिसण्याकडे जास्त लक्ष देतात. या संशोधनासाठी ऑस्ट्रेलियातील 18 ते 65 वयाच्या लोकांचा डेटा आणि सेक्स सर्वेचा अभ्यास केला गेला.
डॉ. स्टीफन सांगतात, पुरुष महिलांपेक्षा शारीरिक रचनेला जास्त महत्व देतात. तर, महिला शिक्षण आणि बुद्धीमत्तेला आणि पुरुष महिलांच्या बोल्ड विचारांना. मात्र आर्थिक बाबतीद दोघेही जास्त महत्व न देण्याला पसंती देतात.
महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टींना महत्व देतात. पण, वय वाढल्यानंतर बोल्ड विचार आणि विश्वासाला दोघेही सारखं महत्व द्यायला लागतात.